शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
2
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
3
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
4
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
5
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
6
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
7
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
8
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
9
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
10
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला बाप्पाला दूर्वा सोडून का वाहिली जाते तुळस?
11
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
12
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
13
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
14
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
15
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
16
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
17
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
18
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
19
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
20
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष

Coronavirus : कोरोनाचा असाही फायदा! तब्बल 7 वर्षांनी कुटुंबियांना सापडला बेपत्ता मुलगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 13:35 IST

Coronavirus : अनेक वर्षांपासून बेपत्ता झालेला मुलगा कोरोनाच्या संकटामुळे कुटुंबियांना पुन्हा मिळाला आहे.

छपरा - कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असून, रुग्णांची संख्यादेखील वाढतेच आहे. देशात गेल्या 24 तासांत 354 नवीन कोरोनाग्रस्त आढळून आले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 4421 वर पोहोचली असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 114 वर पोहोचला आहे. देशातील 4421 कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी 3981 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 325 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. याच दरम्यान विविध घटना समोर येत आहेत. कोरोनाचा कहर सुरू असताना एका कुटुंबाला कोरोनाचा फायदा झाला आहे. तब्बल 7 वर्षांनी बेपत्ता असलेला मुलगा सापडला आहे. बिहारच्या छपरामधील मित्रसेन गावात ही घटना घडली आहे. अनेक वर्षांपासून बेपत्ता झालेला मुलगा कोरोनाच्या संकटामुळे कुटुंबियांना पुन्हा मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गावातील बाबुलाल दास यांचा मुलगा अजय कुमार उर्फ विवेक दास हा सात वर्षांपूर्वी अचानक बेपत्ता झाला होता. त्यानंतर कुटुंबीयांनी त्याचा खूप शोध घेतला. पण तो काही सापडला नाही. दोन-तीन वर्षांनंतरही तो घरी परत आला नाही. मग तो जिवंत नाही असं समजून घरच्यांनी त्याचा विचार करायचा सोडून दिला. त्यांनी त्याचा शोध घेणंही बंद केलं. मात्र त्याच्या आई-वडिलांना एक दिवस आपला मुलगा नक्की घरी परत येईल अशी आशा होती.

उत्तर प्रदेश पोलीस सोमवारी ( 6 एप्रिल) एका तरुणाला घेऊन भेल्दी पोलीस ठाण्यात दाखल झाले. अजय कुमार उर्फ विवेक दास असे नाव सांगून त्याच्याबाबत विचारणा करू लागले. पोलीस अजयला घेऊन त्याच्या मित्रसेन गावी पोहोचले. घरातून बेपत्ता झाल्यानंतर अजय भरकटत उत्तर प्रदेशच्या बाराबंकी येथे पोहोचला. तिथे एका गुन्ह्यात त्याला तुरुंगवास झाला आणि तो शिक्षा भोगत होता. सध्या कोरोनामुळे काही कैद्यांना पॅरोलवर सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यात अजय कुमारचं नाव आहे अशी माहिती पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांना दिली. मुलगा घरी आल्याने त्याच्या आई-वडिलांना खूप आनंद झाला आहे.

महाराष्ट्रातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 868 वर पोहचली आहे. तसेच  मागील 24 तासांत मुंबई शहर उपनगरात 57 नव्या कोरोना (कोविड-19) रुग्णांचे निदान झाले असून आता महानगरातील कोरोना बाधितांची संख्या 490 वर जाऊन पोहोचली आहे. तर मुंबईत शनिवारी व रविवारी प्रत्येकी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने शहर उपनगरातील मृतांचा आकडा 34 वर पोहोचला आहे. राज्यभरासह देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे (AIIMS)संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी एक धोक्याचा इशारा दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus: देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ, गेल्या २४ तासात तब्बल ३५४ नवे रुग्ण

'फिर मुस्कुराएगा इंडिया...फिर जीत जाएगा इंडिया', नरेंद्र मोदींनी शेअर केला व्हिडीओ

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसIndiaभारतDeathमृत्यू