शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

CoronaVirus News: मोठं यश! भारताने 'फेलुदा' स्ट्रिप केली विकसित; आता काही मिनिटांत होणार कोरोनाचं निदान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 9:53 AM

भारतीय शास्त्रज्ञांनी एक पेपर-आधारित चाचणी पट्टी तयार केली असून, ती अवघ्या काही मिनिटांत कोरोनाचं निदान करणार आहे.

ठळक मुद्देजगभरात वेगाने वाढणार्‍या कोरोना व्हायरसचा संसर्ग कमी करण्यासाठी वैज्ञानिक दिवसरात्र प्रयत्न करत असून, कोरोनावर लस विकसित करण्यासाठीही प्रयत्नशील आहेत. वैज्ञानिक नवनव्या प्रयोगांद्वारे कोरोनावर उपचार आणि त्याचं लवकर निदान व्हावं, यासाठी माहिती गोळा करत आहेत.भारतीय शास्त्रज्ञांनी एक पेपर-आधारित चाचणी पट्टी तयार केली असून, ती अवघ्या काही मिनिटांत कोरोनाचं निदान करणार आहे.

नवी दिल्लीः जगभरात वेगाने वाढणार्‍या कोरोना व्हायरसचा संसर्ग कमी करण्यासाठी वैज्ञानिक दिवसरात्र प्रयत्न करत असून, कोरोनावर लस विकसित करण्यासाठीही प्रयत्नशील आहेत. वैज्ञानिक नवनव्या प्रयोगांद्वारे कोरोनावर उपचार आणि त्याचं लवकर निदान व्हावं, यासाठी माहिती गोळा करत आहेत. आता नवीन प्रकारचं किट तयार केलेलं असून, वैज्ञानिक लवकरच त्याची चाचपणी करणार आहेत. कोरोनाच्या या युद्धात भारतीय शास्त्रज्ञांना आता मोठे यश मिळाले आहे. भारतीय शास्त्रज्ञांनी एक पेपर-आधारित चाचणी पट्टी तयार केली असून, ती अवघ्या काही मिनिटांत कोरोनाचं निदान करणार आहे.या टेस्ट किटला 'फेलुदा' असे नाव देण्यात आले आहे. या किटचे नाव बांगला चित्रपट निर्माते सत्यजित रे यांच्या चित्रपटातून काढण्यात आले आहे. फेलुदा हे त्यांच्या चित्रपटांतील एक पात्र आहे. बंगालमधील एक खासगी गुप्तहेर जो प्रत्येक समस्येमागचे रहस्य शोधून काढतो. त्या पात्राचं नाव या किटला देण्यात आलं आहे.  कागदासारखी पातळ पट्टीमध्ये एक रेष आल्यास समजणार आहे की, एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आहे की नाही.वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (सीएसआयआर)च्या शास्त्रज्ञांना कोरोनाच्या जलद चाचणीसाठी नवीन किट विकसित करण्यात मोठे यश मिळवले आहे.एखाद्या व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचं काही मिनिटांत फेलुदामुळे समजणार आहे. सीएसआयआरशी संबंधित असलेल्या दिल्लीतल्या जेनोमिक्स अँड एम्बेडेड बायोलॉजी (आयजीआयबी)च्या वैज्ञानिकांनी विकसित केलेले हे पेपर स्ट्रिप आधारित चाचणी किट आहे.आयजीआयबीचे वैज्ञानिक डॉ. सौविक मॅटी आणि डॉ. देबाज्योती चक्रवर्ती यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही पेपर स्ट्रिप आधारित चाचणी किट विकसित केली आहे. हे किट एका तासापेक्षा कमी वेळात नवीन कोरोना विषाणूचे (एसएआरएस-सीओव्ही -२) व्हायरल आरएनए शोधू शकते. वैज्ञानिक सांगतात की, पेपर स्ट्रिप किट सामान्यत: वापरल्या जाणार्‍या चाचणी पद्धतींपेक्षा खूपच स्वस्त आहे आणि एकदा ते विकसित झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात कोरोना चाचणी करण्याचं आव्हान पूर्ण करता येण्यास मदत होणार आहे. देबज्योती चक्रवर्ती म्हणाले," सध्या या चाचणी किटची वैधता तपासली जात आहे, ती पूर्ण झाल्यानंतर नवीन कोरोना विषाणूच्या चाचणीसाठी त्याचा उपयोग केला जाऊ शकतो. " हे किट सुरू झाल्यामुळे व्हायरस तपासणीसाठी वापरल्या जाणार्‍या महागड्या रिअल टाईम पीसीआर मशीनची आवश्यकता भासणार नाही. नवीन किटचा वापर करून चाचणीची किंमत सुमारे 500 रुपयांवर येऊ शकते. आयजीआयबीच्या शास्त्रज्ञांनी सांगितले की, ते जवळपास अनेक महिन्यांपासून यावर कार्यरत आहेत. परंतु जानेवारीच्या शेवटी, जेव्हा चीनमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला होता, तेव्हा कोरोनाचं निदान करण्यात हे किट किती प्रभावी ठरू शकते हे शोधण्यासाठी चाचणी घेण्यास सुरुवात केली. या अभ्यासाच्या निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी आयजीआयबीचे शास्त्रज्ञ गेल्या दोन महिन्यांपासून रात्रंदिवस काम करत होते.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus: मोदींनी दिलेला आधार उद्योगजगत कधीही विसरणार नाही- नितीन गडकरी

Coronavirus: ...तर आपण विश्वासार्ह जागतिक शक्ती बनू; मोदींच्या महापॅकेजचं उद्योगजगताकडून कौतुक

Coronavirus: …म्हणजे २० लाख कोटी नव्हे तर १४ लाख कोटी पॅकेजची होणार नवीन घोषणा!

Coronavirus: २० लाख कोटींमध्ये शून्य किती?; अनुपम खेर यांनी सांगितलं गणित तर अर्थमंत्र्यांचीही झाली चूक

धक्कादायक! कोरोना संक्रमित जवानानं रुग्णालयातच गळफास घेऊन केली आत्महत्या

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या