Coronavirus: मोदींनी दिलेला आधार उद्योगजगत कधीही विसरणार नाही- नितीन गडकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 08:51 AM2020-05-13T08:51:44+5:302020-05-13T08:58:31+5:30

पंतप्रधान मोदींनी लघु उद्योग, कुटीर उद्योग आणि ग्रामीण उद्योगांना दिलेला हा आधार उद्योगजगत कधीच विसरणार नाही. 

The industry will never forget the support given by Modi- Nitin Gadkari vrd | Coronavirus: मोदींनी दिलेला आधार उद्योगजगत कधीही विसरणार नाही- नितीन गडकरी

Coronavirus: मोदींनी दिलेला आधार उद्योगजगत कधीही विसरणार नाही- नितीन गडकरी

googlenewsNext
ठळक मुद्दे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजच्या केलेल्या घोषणेचे कौतुक केले आहे. कोरोना विषाणूचा धोका रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनमुळे झालेल्या अर्थव्यवस्थेचे नुकसान भरुन काढण्यासाठी मदत करेल, असंही गडकरी म्हणाले आहेत. पंतप्रधान मोदींनी लघु उद्योग, कुटीर उद्योग आणि ग्रामीण उद्योगांना दिलेला हा आधार उद्योगजगत कधीच विसरणार नाही. 

नवी दिल्लीः केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजच्या केलेल्या घोषणेचे कौतुक केले आहे. कोरोना विषाणूचा धोका रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊनमुळे झालेल्या अर्थव्यवस्थेचे नुकसान भरुन काढण्यासाठी मदत करेल, असंही गडकरी म्हणाले आहेत. पंतप्रधान मोदींनी लघु उद्योग, कुटीर उद्योग आणि ग्रामीण उद्योगांना दिलेला हा आधार उद्योगजगत कधीच विसरणार नाही. 

या उद्योगांमध्ये काम करणार्‍या ११ कोटींहून अधिक कामगारांना दिलासा मिळणार आहे. आम्ही या संकटातून बाहेर पडू, सुपर आर्थिक शक्ती बनू आणि विकासाच्या मार्गावर जाऊ, असंही गडकरी म्हणाले आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेत २९ टक्के योगदान हे लघु उद्योगांचं आहे. येत्या काळात हे योगदान आणखी वाढेल. या संकटातून बाहेर पडून आपण ऐतिहासिक विकास करू, असा विश्वासही गडकरींनी व्यक्त केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी कोरोना विषाणूच्या साथीने व लॉकडाऊनने बाधित झालेल्या अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि शेतकरी, कामगार, मध्यमवर्गीय लोकांसह सर्व बाधित घटक व प्रदेशांना दिलासा देण्यासाठी २० लाख कोटी रुपयांच्या विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा केली.पंतप्रधानांनी मंगळवारी २० लाख कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले, जे देशाच्या जीडीपीच्या १० टक्के आहे. शेतकरी, श्रमिक, गरीब, मध्यम वर्गासह समाजातील सर्व घटकांसोबत कुटीर, सूक्ष्म, लघु-मध्यम उद्योगाला दिलासा देण्यासाठी घोषित २० लाख कोटींच्या विशेष आर्थिक योजनेमुळे स्वावलंबी भारताला गती मिळेल. सरकार आणि भारतीय रिझर्व्ह बँकेने घोषित केलेल्या निर्णयांसह हे विशेष आर्थिक पॅकेज २० लाख कोटींचे असेल.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus: ...तर आपण विश्वासार्ह जागतिक शक्ती बनू; मोदींच्या महापॅकेजचं उद्योगजगताकडून कौतुक

Coronavirus: …म्हणजे २० लाख कोटी नव्हे तर १४ लाख कोटी पॅकेजची होणार नवीन घोषणा!

Coronavirus: २० लाख कोटींमध्ये शून्य किती?; अनुपम खेर यांनी सांगितलं गणित तर अर्थमंत्र्यांचीही झाली चूक

धक्कादायक! कोरोना संक्रमित जवानानं रुग्णालयातच गळफास घेऊन केली आत्महत्या

Web Title: The industry will never forget the support given by Modi- Nitin Gadkari vrd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.