Coronavirus : धक्कादायक! कोरोनाच्या भीतीने दाम्पत्याची आत्महत्या, पोस्‍टमार्टम करण्यास डॉक्टरचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2020 09:19 AM2020-04-04T09:19:43+5:302020-04-04T09:29:57+5:30

Coronavirus : संसर्गजन्य रोगाचा मुकाबला करून ही साथ थोपविण्यासाठी या उपायांचे काटेकोरपणे पालन करणे जरुरी आहे.

Coronavirus amritsar husband wife commits suicide in amritsar in fear of covid 19 SSS | Coronavirus : धक्कादायक! कोरोनाच्या भीतीने दाम्पत्याची आत्महत्या, पोस्‍टमार्टम करण्यास डॉक्टरचा नकार

Coronavirus : धक्कादायक! कोरोनाच्या भीतीने दाम्पत्याची आत्महत्या, पोस्‍टमार्टम करण्यास डॉक्टरचा नकार

Next

नवी दिल्ली - भारतात गेल्या चोवीस तासांत कोरोना संसर्गित रुग्णांची संख्या 2,567 वर पोहोचली आहे; तर, आतापर्यंत 72 जणांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह-सचिव लव अग्रवाल यांनी शुक्रवारी गेल्या दोन दिवसांत 14 राज्यांत एकदम 647 रुग्ण आढळले; तथापि, हे सर्व दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमाशी संबंधित आहेत. लॉकाडाऊन, सोशल डिस्टन्सिंगच्या उपायांमुळे रुग्णांच्या संख्येत एकदम वाढत होताना दिसत नाही. तेव्हा या संसर्गजन्य रोगाचा मुकाबला करून ही साथ थोपविण्यासाठी या उपायांचे काटेकोरपणे पालन करणे जरुरी असल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं. याच दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोनाच्या भीतीने एका दाम्पत्याने आत्महत्या केली असून डॉक्टरांनी पोस्‍टमार्टम करण्यास नकार दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमृतसरमध्ये कोरोनाच्या भीतीने एका दाम्पत्याने शुक्रवारी ( 3 एप्रिल ) आत्महत्या केली. मात्र डॉक्टरांनी त्यांचं पोस्‍टमार्टम करण्यास नकार दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमृतसरमधील सठियाला गावात ही घटना घडली आहे. गुरजिंदर कौर आणि त्यांच्या पत्नी बलविंदर कौर असं आत्‍महत्‍या करणाऱ्या दाम्पत्याचं नाव आहे. या दाम्पत्याकडे सुसाईड नोटही सापडली आहे. कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे जीवन संपवत असल्याचं सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी रुग्णालयात हलवले. मात्र तिथे डॉक्टरने मृतदेहांचे पोस्‍टमार्टम करण्यास नकार दिला. 

कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे दाम्पत्याने आत्‍महत्‍या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये तसा उल्लेख केला आहे. 'कोरोना व्हायरसच्या संक्रमणाने मरण्याची आमची इच्छा नाही. आम्हाला कोरोना होण्याची भीती आहे' असे दाम्पत्याने सुसाईड नोटमध्ये म्हटलं आहे. उत्तर प्रदेशमध्येही अशीच एक घटना घडली आहे. आधीपासून नैराश्यावस्थेत असलेल्या एका सरकारी कर्मचाऱ्याने कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे स्वत:च्या कार्यालयात गळफास लावून आत्महत्या केली.

सरकारी कर्मचाऱ्याने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे की, कोरोनाची लागण होईल, अशी भीती मला सतत वाटत होती. या गोष्टीला त्याच्या नातेवाईकांनीही दुजोरा दिला आहे. छत्तीसगडमध्ये घरातच एकांतवासात ठेवलेल्या कोरोनाच्या एका संशयित रुग्णाने काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. ही व्यक्ती  तामिळनाडूहून छत्तीसगडला परतली होती. कोरोना आजारसदृश्य लक्षणे जाणवू लागल्याने त्याला एकांतवासात ठेवण्यात आले होते. तो छत्तीसमधील धमतरीजवळील तागापानी गावचा रहिवासी होता.

महत्त्वाच्या बातम्या

Jammu And Kashmir : कुलगाम चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

coronavirus : इटली, स्पेननंतर अमेरिकेत कोरोनाचा प्रकोप, एका दिवसात गेले इतके बळी

चार देशांतील नागरिकांना १८ विशेष विमानांतून धाडणार मायदेशी; कोरोनामुळे अडकले भारतात

Coronavirus: भारतातील रुग्णांची संख्या ३१५३ वर

 

Web Title: Coronavirus amritsar husband wife commits suicide in amritsar in fear of covid 19 SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.