Jammu Kashmir 2 terrorists killed Exchange fire between security forces & terrorists SSS | Jammu And Kashmir : कुलगाम चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Jammu And Kashmir : कुलगाम चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

श्रीनगर - कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जम्मू-काश्मीरसह देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लोकांनी घराबाहेर पडू नये यासाठी वारंवार प्रशासनाकडून आवाहन देखील करण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. जम्मू-काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील मनगोरी परिसरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू झाली आहे. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना मोठं यश आले आहे. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे. 

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये कुलगाममध्ये चकमक सुरू झाली. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला असून त्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. 

गेल्या काही दिवसांपासून शस्त्रसंधीचे उल्लंघन करून दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी यासाठी पाकिस्तानकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. मात्र, याला भारतीय सुरक्षारक्षकांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. जम्मू-काश्मीरच्या राजौरी सेक्टरमध्ये सुंदरबन परिसरात  शुक्रवारी  ( 3 एप्रिल ) सीमारेषेचं उल्लंघन करत मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला होता. भारतीय सैन्याकडून या हल्ल्याला चौख प्रत्युत्तर देण्यात आलं. मात्र राजौरी येथील झालेल्या चकमकीत 6 जवान जखमी झाले. त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

चार देशांतील नागरिकांना १८ विशेष विमानांतून धाडणार मायदेशी; कोरोनामुळे अडकले भारतात

Coronavirus: भारतातील रुग्णांची संख्या ३१५३ वर

 

Web Title: Jammu Kashmir 2 terrorists killed Exchange fire between security forces & terrorists SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.