शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

Coronavirus  : 'देशातील 400 जिल्हे कोरोनामुक्त, पुढचे 2-3 आठवडे अत्यंत महत्त्वाचे' 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2020 08:36 IST

Coronavirus  : देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1118 नवे रुग्ण आढळले आहेत, तर 39 लोकांचा मृत्यू झाला आहे.

नवी दिल्ली - देशात वेगाने कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊन 3 मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 1118 नवे रुग्ण आढळले आहेत, तर 39 लोकांचा मृत्यू झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे. याच दरम्यान कोरोना संदर्भात एक दिलासादायक माहिती समोर आली आहे. देशातील तब्बल 400 जिल्हे कोरोनामुक्त असल्याची माहिती मिळत आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील 718 पैकी 400 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. कोरोना एकही रुग्ण तिथे आढळलेला नाही. यामुळे सरकार या जिल्ह्यांना कोरोनामुक्त कायम ठेवण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहे. तर ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव झाला आहे त्यांचा तपास करण्यात आम्हाला यश आलं आहे. तसंच पुढचे 2-3 आठवडे हे देशासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. तसेच महाराष्ट्रातील स्थिती गंभीर बनत चालली आहे. मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

चीनमध्ये 7 जानेवारीला कोरोना संसर्ग झालेला पहिला रुग्ण आढळून आला होता. यानंतर आपण 8 जानेवारीपासून तज्ज्ञांची बैठक बोलावली होती. यानंतर 17 जानेवारीला केंद्र सरकारने आरोग्यासंबंधीचे दिशानिर्देशही जारी केले अशी माहिती आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे. तसेच बिहारमधील कोरोनाची स्थिती नियंत्रणात आहे. पण महाराष्ट्रातील स्थिती गंभीर बनत चालली आहे. खास करून मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. कर्नाटकमध्येही स्थिती बिघडली आहे. पण तिन्ही राज्यांच्या सचिवांनी दाखवलेल्या विश्वासाने आम्ही समाधानी आहोत. केंद्र सरकारच्या आदेशांनुसार आसाममध्येही विदेशी दारूची सर्व दुकानं आणि बॉटलिंग प्लांट्स, डिस्टलरीज आणि ब्रुअरीज बंद राहणार असल्याची माहिती हर्षवर्धन यांनी दिली आहे.

देशात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 11,933 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत 39 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला असून मृतांची एकूण संख्या 392 इतकी झाली आहे. तर 1344 जण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशात 3 मेपर्यंत लॉकडाऊन वाढविणार असल्याचे सांगितले. याशिवाय, 20 एप्रिलपासून ज्याठिकाणी कोरोनाचा हॉटस्पॉट नाही, ते ठिकाण एका नियमावलीनुसार लॉकडाऊनमधून वगळण्याची शक्यता नरेंद्र मोदी यांनी वर्तविली होती. त्यानुसार केंद्रीय गृहमंत्रालयाकडून बुधवारी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

२० एप्रिलनंतर शेतीची कामे, ग्रामीण उद्योगांसह औद्योगिक वसाहती सुरू

CoronaVirus अमेरिकेत दिवसभरात २६०० मृत्यू; ट्रम्प म्हणाले 'कळसच गाठला'

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसIndiaभारतMaharashtraमहाराष्ट्रMumbaiमुंबईBiharबिहारDeathमृत्यू