देशात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत आहेत. कोरोनाच्या एक्टिव्ह रुग्णांची संख्या १२०० झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांमध्ये JN.१ व्हेरिएंटचा समावेश आहे, जो ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट आहे. तज्ज्ञांनी अशा परिस्थितीत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. बनारस हिंदू विद्यापीठाचे (BHU) प्राध्यापक ज्ञानेश्वर चौबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, "लोकांमध्ये अँटीबॉडीजची संख्या कमी होत आहे, ज्यामुळे कोरोना परत येत आहे. या लाटेचा परिणाम २१-२८ दिवसांपर्यंत राहील, मात्र तो दुसऱ्या लाटेसारखा घातक नसेल."
"सिंगापूर, चीन, हाँगकाँगमध्ये कोरोना रुग्णांची संख्या ही वेगाने वाढत आहेत, सध्या भारतात ही संख्या कमी आहे. कालांतराने लोकांमध्ये अँटीबॉडीजची पातळी कमी होत आहे. पूर्वीच्या संशोधनात असं आढळून आलं होतं की अँटीबॉडीजची पातळी कमी होत आहे, ज्यामुळे केसेस वाढत आहेत. यावेळी हा व्हायरस फार धोकादायक नाही. कोरोना रुग्णांची संख्या मोजण्याऐवजी आपण धोक्यांवर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. ज्यांनी लस घेतली आहे त्यांना संसर्ग होऊ शकतो परंतु धोका कमी आहे. जर रुग्णांची संख्या वेगाने वाढली तर तो २८ ते ३० दिवस टिकेल."
कोरोना लहान मुलांवर करतोय ॲटॅक; संसर्ग झाल्यास अशी घ्या खबरदारी, करू नका 'या' चुका
“काळजी करण्याची काहीच गरज नाही"
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) कानपूरचे संचालक प्रोफेसर मनिंद्र अग्रवाल यांच्या मते देशाच्या लोकसंख्येनुसार कोरोनाच्या रुग्णांची संख्या अजूनही कमी आहे. आतापर्यंत कोणतीही गंभीर परिस्थिती दिसून आलेली नाही, त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. हा ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट आहे, २०२२ पासून सब व्हेरिएंटमुळे ही संख्या अधूनमधून वाढते परंतु नंतर कमी होते. यावेळीही असेच असेल, काळजी करण्याची काहीच गरज नाही. विशेष खबरदारी घेण्याची गरज नाही, सामान्य फ्लूप्रमाणे विचार करा आणि त्याच प्रकारे खबरदारी घ्या.
कोरोनाचा कहर! अमेरिकेत नवा व्हेरिएंट, भारतात वाढले रुग्ण; हाँगकाँग-तैवानमध्ये परिस्थिती गंभीर
"कोरोनासोबत जगण्याची सवय लावा”
मॅक्स हॉस्पिटलमधील हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मनोज यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची लाट २०२३ मध्ये आली होती, जर तुम्ही लस घेतली असेल तर घाबरून जाण्याची गरज नाही पण सतर्कता आवश्यक आहे. कोरोनासोबत जगण्याची सवय लावा, लसीचे अपग्रेडिंग आवश्यक आहे. या व्हेरिएंटसाठी प्रभावी लस आणावी लागेल. आकडेवारीनुसार, आम्हाला वाटत नाही की ते डेल्टा व्हेरिएंटइतके घातक असेल परंतु सतर्क राहणं आणि काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे.