Corona virus : कोरोनाचं औषध सांगून ५०० रुपयांना गोमूत्र विकणाऱ्या भामट्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 15:08 IST2020-03-19T14:54:07+5:302020-03-19T15:08:11+5:30
कोरोना व्हायरसच्या उपचाराबद्दल अफवा पसरवत असलेल्या पश्चिम बंगाल मधील हुगली जिल्ह्यातील एका दुध विक्रेत्याला अटक केली आहे.

Corona virus : कोरोनाचं औषध सांगून ५०० रुपयांना गोमूत्र विकणाऱ्या भामट्याला अटक
कोरोना व्हायरस झपाट्याने पसरत आहे. व्हायरसशी निगडीत अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. या आजारावर आत्तापर्यंत कोणतेही औषध तयार करण्यात आलेले नाही. तसंच लस सुद्धा उपलब्ध झालेली नाही. या गोष्टीशी निगडीत असलेली एक धक्कादायक घटना काल समोर आली. कोरोना व्हायरसच्या उपचाराबद्दल अफवा पसरवत असलेल्या पश्चिम बंगाल मधील हुगली जिल्ह्यातील एका दूध विक्रेत्याला अटक केली आहे.
या दूध विक्रेत्यांवर गोमुत्र विकण्यासोबतच लोकांना धोका देण्याचा आरोप करण्यात आला होता. तसंच लोकांच्या धार्मीक भावनांना ठेच पोहोचवण्याचा सुद्धा आरोप करण्यात आला होता. कोरोनाचा संसर्ग होऊ नये योग्य ती खबरदारी घेण्यात येत असून अनेक उपाय हे केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी अखिल भारतीय हिंदू महासभेने गोमूत्र पार्टीचं आयोजन केलं होतं. गोमूत्र प्यायल्याने कोरोना दूर होतो, असा दावा हिंदू महासभेने केला होता. त्यानंतर आता गोमूत्र आणि शेणाला अधिक मागणी असल्याची माहिती समोर आली आहे.
गायीच्या दुधापेक्षा गोमूत्र आणि शेणाची किंमत ही कित्येक पटीने जास्त आहे. देशामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने गोमूत्र आणि शेणाचे भाव वाढत असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले होते. रिपोर्टनुसार, गोमूत्र हे 500 रुपये लीटर तर गायीचे शेण हे 500 रुपये किलो या दरात विकले जात होते. ( हे पण वाचा-Coronavirus and Diabetes : डायबिटीसच्या रूग्णांनी रहा सतर्क, 'या' तीन गोष्टींची घ्या विशेष काळजी!)
काहींनी गोमूत्र आणि शेण विक्रीसाठी रस्त्याच्या कडेला दुकाने उभारली होती. दिल्ली आणि कोलकाताला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर शेण आणि गोमूत्र यांची विक्री केली जात होती. (हे पण वाचा-Corona virus : पाच दिवसात 'ही' लक्षणं दिसली, तर कोरोनाची तपासणी लगेच करा नाहीतर....)