शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
4
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
5
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
6
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
7
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
8
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
9
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
10
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
11
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
12
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
13
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
14
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
15
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
16
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
17
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
18
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
19
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
20
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं

दिलासादायक! येत्या आठवड्यापासून 'या' देशांमध्ये प्रवास करू शकतील भारतीय, पाहा संपूर्ण यादी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 12:08 IST

Corona Virus : बर्‍याच देशांनी आता भारतीयांसाठी आपल्या सीमा उघडल्या आहेत. येत्या आठवड्यापासून भारतीय पर्यटक या देशांमध्ये प्रवासासाठी जाऊ शकतात.

भारतात सध्या कोरोना व्हायरसच्या घटनांमध्ये घट होत आहे. तसेच, जगातील अनेक देशांमध्ये सुद्धा कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. अशा परिस्थितीत बर्‍याच देशांनी आता भारतीयांसाठी आपल्या सीमा उघडल्या आहेत. येत्या आठवड्यापासून भारतीय पर्यटक या देशांमध्ये प्रवासासाठी जाऊ शकतात. भारतीयांसाठी आपल्या देशात प्रवेश देणाऱ्यांच्या यादीत कॅनडा, मालदीव, जर्मनी यांचा समावेश आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान बर्‍याच देशांनी भारतातील नागरिकांसाठी प्रवेश बंदी घातली होती. (indians can visit these countries from next week)

कॅनडाकॅनडाच्या सार्वजनिक आरोग्य एजन्सीने 3 जुलै रोजी जाहीर केले की, केवळ नागरिक आणि देशातील कायमस्वरुपी रहिवाशांसाठी प्रवासी निर्बंध शिथित करीत आहेत. आंतरराष्ट्रीय विद्यार्थी, स्थानिक रहिवासी यांचे नातेवाईक आणि तात्पुरते कामगार यांना वैध वर्क परमिट सुलभ करण्याच्या उद्देशाने या कारवाईचे उद्दिष्ट आहे. तसेच, भारतीयांसह सर्व प्रवाशांना कॅनडामध्ये प्रवेश केल्याच्या 72 तासांच्या (3 दिवस) आत निगेटिव्ह कोरोनाची चाचणी केल्या अहवाल अनिवार्यपणे सादर करावा लागेल.

देशात प्रवेश करणाऱ्यांना कोरोना लसीचे दोन्ही डोस घेणे आवश्यक आहे. सध्या, कॅनडा सरकारने मॉडर्न, फायझर-बायोटेक, अ‍ॅस्ट्राजेनेका / कोव्हिशिल्ड आणि जॉन्सन अँड जॉन्सन या लसींना मान्यता दिली आहे. भारताची देशी लस कोव्हॅक्सिन आणि रशियन-निर्मित स्पुतनिक व्ही या लसींना अद्याप कॅनडाने मंजूरी दिलेली नाही.

जर्मनी :भारतातील जर्मनीचे राजदूत वाल्टर जे लिंडनर यांनी मंगळवारी सांगितले की, भारतासह डेल्टा व्हेरिएंटचा प्रादुर्भाव झालेल्या पाच देशांवरील निर्बंध देशाने हटविले आहेत. आता भारतीय प्रवाशांना, ज्यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत किंवा जे व्हायरसपासून बरे होण्याचे पुरावे दाखवू शकतात, त्यांना आता जर्मनीत प्रवेश केल्यानंतर सेल्फ क्वारंटाइन राहण्याची गरज नाही.

मालदीव :मालदीवसाठी विमान सेवा 15 जुलैपासून पुन्हा सुरू होणार आहे. प्रवाशांना अनिवार्यपणे एक निगेटिव्ह आरटी-पीसीआर टेस्ट रिपोर्ट घ्यावा लागेल. कोरोना रिपोर्ट दाखविल्यानंतर मालदीवमध्ये सेल्फ क्वारंटाइन राहण्याची गरज भासणार नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारतCanadaकॅनडाGermanyजर्मनी