Coronavirus : ...म्हणून गायीच्या दुधापेक्षा गोमूत्र, शेणाला मिळतोय इतका भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 10:54 AM2020-03-18T10:54:21+5:302020-03-18T11:01:21+5:30

Coronavirus: गायीच्या दुधापेक्षा गोमूत्र आणि शेणाची किंमत ही कित्येक पटीने जास्त आहे.

corona virus cow dung and urine selling at 500 rupees per kg SSS | Coronavirus : ...म्हणून गायीच्या दुधापेक्षा गोमूत्र, शेणाला मिळतोय इतका भाव

Coronavirus : ...म्हणून गायीच्या दुधापेक्षा गोमूत्र, शेणाला मिळतोय इतका भाव

googlenewsNext
ठळक मुद्देगायीच्या दुधापेक्षा गोमूत्र आणि शेणाची किंमत ही कित्येक पटीने जास्त आहे. देशामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने गोमूत्र आणि शेणाचे भाव वाढत आहेत.गोमूत्र हे 500 रुपये लीटर तर गायीचे शेण हे 500 रुपये किलो या दरात विकले जात आहे.

नवी दिल्ली - जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. भारतातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून ही संख्या 147 पर्यंत पोहोचली आहे. तर जगभरात कोरोना व्हायरसमुळे 7000 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग होऊ नये योग्य ती खबरदारी घेण्यात येत असून अनेक उपाय हे केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी अखिल भारतीय हिंदू महासभेने गोमूत्र पार्टीचं आयोजन केलं होतं. गोमूत्र प्यायल्याने कोरोना दूर होतो, असा दावा हिंदू महासभेने केला होता. त्यानंतर आता गोमूत्र आणि शेणाला अधिक मागणी असल्याची माहिती समोर आली आहे. 

गायीच्या दुधापेक्षा गोमूत्र आणि शेणाची किंमत ही कित्येक पटीने जास्त आहे. देशामध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने गोमूत्र आणि शेणाचे भाव वाढत असल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने दिले आहे. रिपोर्टनुसार, गोमूत्र हे 500 रुपये लीटर तर गायीचे शेण हे 500 रुपये किलो या दरात विकले जात आहे. काहींनी गोमूत्र आणि शेण विक्रीसाठी रस्त्याच्या कडेला दुकाने उभारली आहेत. दिल्ली आणि कोलकाताला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर शेण आणि गोमूत्र यांची विक्री केली जात आहे. विक्री करणाऱ्या दुकानदाराने दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या हिंदू महासभेच्या गोमूत्र पार्टीकडून ही कल्पना सुचल्याची माहिती दिली आहे. 

हिंदू महासभेच्या गोमूत्र पार्टीला जमलेल्या काहींनी विमानतळावर दारूबंदी करण्यात यावी आणि त्याजागी गोमूत्र ठेवण्यात यावं, अशी मागणी सरकारकडे करणार असल्याचं सांगितलं होतं. तसेच ट्रम्प यांनाही गोमूत्र पाठवणार आहोत, अशी माहिती एकाने दिली होती. आम्ही पंतप्रधान मोदींची  भेट घेणार आहोत. ते तर स्वतः गोमूत्र पितात, असा दावाही त्यांनी केला होता. अनुराग कश्यप यांनी काही दिवसांपूर्वी 'अच्छे दिन' या शीर्षकासह हा व्हिडीओ शेअर केला होता. कश्यप यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओवर शेकडो कमेंट्स आल्या होत्या. 

कोरोनामुळे भारतात तीन जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. भारतात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. 122 भारतीयांना आणि 25 परदेशी व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आतापर्यंत दिल्लीमध्ये एक, कर्नाटकात एक आणि महाराष्ट्रात एक अशा एकूण 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर आंध्र प्रदेशनमध्ये 1, दिल्लीमध्ये 10, हरियाणामध्ये 16, कर्नाटकात 11, केरळमध्ये 27, महाराष्ट्रात 42, ओडिशामध्ये 1, पंजाबमध्ये एका व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाला आहे.  सध्या भारतात दुसऱ्या टप्प्यात कोरोना आहे. म्हणजेच कोरोना व्हायरस संक्रमित असलेल्या देशातून ज्या व्यक्ती भारतात आल्या आहेत त्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्यानंतर अनेकांना त्याचा संसर्ग होतो. सध्या भारतात बाहेरून आलेल्या लोकांना कोरोना झाला आहे. मात्र याबाबत योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. 

महत्त्वाच्या बातम्या 

Coronavirus: कोरोनाचा संसर्ग वाढला! देशातील रुग्णांची संख्या 147

Coronavirus: एकूण 4 टप्पे! भारतात कोणत्या टप्प्यात आहे 'कोरोना'?, जाणून घ्या  

Coronavirus: राज्यात कोरोनाबाधितांची संख्या 42वर, पुण्यात आढळला आणखी एक रुग्ण 

Coronavirus: सामान्यांचं सोडा; संसदेलाच मिळेनात सॅनिटायझर आणि मास्क

Coronavirus : कोरोनानं लष्करातील जवानही संक्रमित; देशातील रुग्णांची संख्या 140वर

 

Web Title: corona virus cow dung and urine selling at 500 rupees per kg SSS

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.