शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
4
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
5
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
6
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
7
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
8
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
9
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
10
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
11
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
12
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
13
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
14
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
15
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
16
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
17
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
18
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
19
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
20
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे

corona vaccine : अदर पूनावालांचे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना भावूक आवाहन, म्हणाले, “कोरोनाला रोखायचे असेल तर…’’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2021 16:46 IST

corona vaccination News : अमेरिकेसह युरोपमधील काही देशांनी कच्च्या मालाचा पुरवठा थांबवल्याने कोरोनावरील लसीचे उत्पादन करणाऱ्या भारतातील सिरम इन्स्टिट्युटसमोर (Serum Institute of India)  मोठे आव्हान उभे राहिले आहे.

ठळक मुद्देसिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया कोरोनावरील कोविशिल्ड या लसीचे उत्पादन करत आहेअमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष महोदय, मी तुम्हाला विनंती करतो की, अमेरिकेतून निर्यात होणाऱ्या कच्च्या मालावर घालण्यात आलेले निर्बंध हटवाजेणेकरून कोरोनाविरोधातील लसींचे उत्पादन वाढवता येईल. तुमच्या प्रशासनाकडे याबाबतची पूर्ण माहिती आहे

पुणे - गेल्या दीड वर्षापासून जगभरात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना विषाणूने () पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. भारतात तर कोरोनाचा दुसऱ्या लाटेने भयावह रूप धारण केले आहे. कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे कोरोनाच्या लसीची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. (corona vaccination)  मात्र अमेरिकेसह युरोपमधील काही देशांनी कच्च्या मालाचा पुरवठा थांबवल्याने कोरोनावरील लसीचे उत्पादन करणाऱ्या भारतातील सिरम इन्स्टिट्युटसमोर (Serum Institute of India)  मोठे आव्हान उभे राहिले आहे. तसेच लसीचे उत्पादन ठप्प होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला (Adar Poonawala) यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden ) यांना भावूक आवाहन केले आहे. ( SII CEO Adar Poonawala's emotional appeal to US President Joe Biden )

पूनावाला यांनी ट्विट करून अमेरिकेमधून निर्यात होणाऱ्या कच्च्या मलावर लादलेले निर्बंध हटवण्याची विनंती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना केली आहे. या ट्विटमध्ये अदर पूनावाला म्हणतात की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष महोदय, जर कोरोना विषाणूला हरवण्यासाठी खऱ्या अर्थाने एकजूट व्हायचं असेल तर अमेरिकेच्या बाहेरील लस उद्योगाकडून मी तुम्हाला विनंती करतो की, अमेरिकेतून निर्यात होणाऱ्या कच्च्या मालावर घालण्यात आलेले निर्बंध हटवा. जेणेकरून कोरोनाविरोधातील लसींचे उत्पादन वाढवता येईल. तुमच्या प्रशासनाकडे याबाबतची पूर्ण माहिती आहे. 

 सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया ऑक्सफर्ड विद्यापीठ आणि अॅस्ट्राजेनेकाद्वारे विकसित करण्यात आलेल्या कोरोनावरील कोविशिल्ड या लसीचे उत्पादन करत आहे. भारतामध्ये या लसीच्या वापराला पहिल्यांदा मान्यता मिळाली होती. तसेच या लसीची अनेक देशांना निर्यातही होत आहे. सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया जगातील सर्वाधिक लसींची निर्मिती करते. हल्लीच भारतातील काही राज्यांमध्ये लसींचा तुटवडा निर्माण झाल्याचे वृत्त आले होते. मात्र केंद्र सरकारने कोरोनाविरोधातील लसींचा कुठल्याही प्रकारचा तुटवडा नसल्याचे स्पष्ट केले होते. 

 दरम्यान, अदर पूनावाला यांनी आधीही कोरोनाची लस विकसित करण्यासाठी पुरेसा कच्चा माल उपलब्ध नसल्याचे सांगितले होते. अमेरिकेने डिफेन्स अॅक्ट अंतर्गत कच्च्या मालाच्या निर्यातीवर बंदी आणल्याने लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. कोरोना लसीच्या कच्च्या मालावर बंदी घालणे म्हणजे लसीवर निर्बंध लादण्यासारखे असल्याचे म्हटले होते. सिरम इन्स्टिट्युटमध्ये नोवाव्हॅक्स या कोरोनावरील लसीचेही उत्पादन होत आहे. मात्र कच्च्या मालाच्या तुटवड्यामुळे हे उत्पादन बंद पडले आहे.  सीरम इन्स्टिट्युट अमेरिकेकडून विविध प्रकारच्या कच्च्या मालाची आयात करते. त्याची याजी मोठी आहे. आयत्यावेळी पुरवठादार शोधण्यास उशीर लागणार आहे. कंपनी नवा पुरवठादार शोधत आहे. सहा महिन्यांनंतर अमेरिकेवर अवलंबून राहावे लागणार नाही. मात्र कंपनीला सध्या कच्च्या मालाची गरज आहे, असे पूनावाला यांनी सांगितले.  

टॅग्स :Adar Poonawallaअदर पूनावालाIndiaभारतUnited StatesअमेरिकाJoe Bidenज्यो बायडनCorona vaccineकोरोनाची लस