शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

Corona Vaccination : कोरोना लसीमुळे वंध्यत्व? अफवांवर आरोग्य मंत्रालयाकडून स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2021 10:42 AM

Corona Vaccination : कोरोना लसीकरणामुळे पुरुष व स्त्रियांमध्ये वंध्यत्वाची समस्या उद्भवू शकते अशी चिंता काही मीडिया रिपोर्ट्समध्ये व्यक्त केली होती.

नवी दिल्ली : कोरोना लसीबाबत अनेक अफवा पसरल्या जात आहेत, ज्याचा परिणाम लसीकरणावरही दिसून येत आहे. अशीच एक अफवा चुकीची असल्याचे सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे. असे कोणतेही वैज्ञानिक पुरावे नाहीत, की जे कोरोना लसीमुळे वंध्यत्वाला कारणीभूत ठरतील. त्यामुळे अशा परिस्थितीत अशा गोष्टींकडे लक्ष दिले जाऊ नये, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले. (corona vaccination infertility health ministry clarifies men or women)

कोरोना लसीकरणामुळे पुरुष व स्त्रियांमध्ये वंध्यत्वाची समस्या उद्भवू शकते अशी चिंता काही मीडिया रिपोर्ट्समध्ये व्यक्त केली होती. यावर मंत्रालयाने म्हटले आहे की, अलिकडच्या काळात मीडिया रिपोर्ट्समध्ये फ्रंटलाइन वर्कर्स, हेल्थकेअर वर्कर्समध्ये अंधश्रद्धा आणि इतर गोष्टींबद्दलच्या चिंतेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. पोलिओ व इतर लसीकरण मोहिमेदरम्यान अशा गोष्टीही समोर आल्या होत्या.

कोरोना लसीमुळे वंध्यत्व येत नाही, सर्व लसींची यापूर्वीच सर्व प्रकारे चाचणी घेण्यात आली आहे. त्यांची सविस्तर माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे, असे आरोग्य मंत्रालयाने स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी लसीकरणासंदर्भात राष्ट्रीय तज्ज्ञ समूहाने आवाहन केले होते की गर्भवती महिला, स्तनपान करणारी महिलांनाही लसीकरण आवश्यक आहे आणि ते मुलांच्या सुरक्षेसाठी देखील महत्वाचे आहे.

देशात सध्या सुरू असलेल्या मिशन लसीकरणात अनेक अडथळे येत आहेत. लसीची भीती बरीच ग्रामीण भागात पसरली आहे, काही जण अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतात अशा परिस्थितीत लसीबाबत चुकीची माहिती पसरवू नये म्हणून आवाहन केले जात आहे. सध्या देशात लसीकरण अभियान वेगाने सुरू आहे. सोमवारी देशात ८२ लाखांहून अधिक लसीचे डोस देण्यात आले, जे आतापर्यंतचा विक्रम आहे.

लसीकरणाचा विक्रमसोमवारी सायंकाळपर्यंत देशभरात ८२ लाखांहून अधिक नागरिकांना लस देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली. हे एका दिवसातील आजपर्यंतचे विक्रमी लसीकरण आहे. देशात १६ जानेवारीला लसीकरणाला सुरुवात झाल्यानंतर प्रथमच एकाच दिवशी इतक्या मोठय़ा प्रमाणावर लसीकरण करण्यात आले आहे. देशात आतापर्यंत एकूण २८ कोटी ३३ लाख नागरिकांचे लसीकरण करण्यात आल्याचे केंद्रीय आरोग्य विभागाने सांगितले. 

Pfizer आणि Moderna लसीमुळे प्रजनन क्षमतेत घट होत नाही - स्टडीगेल्या काही दिवसांपूर्वी  फायझर, मॉडर्ना यांनी विकसित केलेली कोरोना लस घेतल्यास प्रजनन क्षमतेवर परिणाम होत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, आता या चर्चांना पूर्णविराम लागण्याची शक्यता एका संशोधनामुळे निर्माण झाली आहे. फायझर, मॉडर्ना या कोरोना लसीमुळे प्रजनन क्षमतेवर परिणाम होत नसल्याचे एका संशोधनात समोर आले आहे. 'जामा' या नियताकालिकेत प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, १८ ते ५० या वयोगटातील ४५ निरोगी व्यक्तींना या संशोधनात सहभागी करून घेण्यात आले होते. त्यांना फायजर-बायोएनटेक आणि मॉडर्नाच्या एमआरएनए कोविड लस देण्यात आली होती. या संशोधनात सहभागी झालेल्या व्यक्तींना यापूर्वीदेखील प्रजननाबाबत कोणतीही समस्या नव्हती.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसHealthआरोग्य