Corona vaccination: कोरोनापेक्षा लसीचे भय! लसीकरणासाठी आलेल्या पथकाला पाहून ग्रामस्थ घाबरले, नदीत उड्या मारून पळाले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 01:18 PM2021-05-23T13:18:51+5:302021-05-23T13:19:23+5:30

Corona vaccination: देशात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्याने चिंतेची परिस्थिती आहे. त्यामुळे लसीकरण वाढवण्याची मागणी केली जात आहे. मात्र कोरोनाविरोधात या लसीबाबत अनेकांच्या मनात गैरसमज निर्माण झालेला आहे.

Corona vaccination: Fear of vaccine than corona! The villagers got frightened when they saw the vaccination team, jumped into the river and fled | Corona vaccination: कोरोनापेक्षा लसीचे भय! लसीकरणासाठी आलेल्या पथकाला पाहून ग्रामस्थ घाबरले, नदीत उड्या मारून पळाले

Corona vaccination: कोरोनापेक्षा लसीचे भय! लसीकरणासाठी आलेल्या पथकाला पाहून ग्रामस्थ घाबरले, नदीत उड्या मारून पळाले

Next

बाराबंकी - देशात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्याने चिंतेची परिस्थिती आहे. त्यामुळे लसीकरण वाढवण्याची मागणी केली जात आहे. मात्र कोरोनाविरोधात या लसीबाबत अनेकांच्या मनात गैरसमज निर्माण झालेला आहे. (Corona vaccination) त्याचाच प्रत्यय उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील एका गावामध्ये आला. येथे येथील सिसौडा गावामध्ये लस देण्यासाठी गेलेल्या आरोग्य पथकाला पाहून लोक घाबरले. या पथकाच्या तावडीत सापडलो तर लस घ्यावी लागेल. या भयाने गावकऱ्यांनी शरयूसारख्या मोठ्या नदीत उड्या मारल्या. हा प्रकार पाहून आरोग्य विभागाचे पथक घाबरले. पथकामधील अधिकारी लोकांना नदीबाहेर येण्याची विनंती करू लागले. अखेर उपजिल्हाधिकाऱ्यांनी समजूत घातल्यावर ग्रामस्थ नदीबाहेर आले. मात्र त्यांच्यापैकी केवळ १४ जणांनीच लस घेतली. ( Fear of vaccine than corona! The villagers got frightened when they saw the vaccination team, jumped into the river and fled)

बाराबंकी जिल्ह्यातील रामनगर तालुक्यातील सिसौडा गावात लसीकरणासाठी पथक पोहोचले होते. या पथकाने गावात लसीकरण सुरू करण्याची घोषणा करताच ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. अनेकांनी पळापळ सुरू केली. काही जणांनी गावाबाहेर धाव घेत गावाबाहेर असलेल्या शरयू नदीत उड्या घेतल्या. याबाबत आरोग्य पथकाला समजताच तेही ग्रामस्थांची समजून घालण्यासाठी नदीच्या दिशेने गेले. या पथकाला पाहून अजून काही ग्रामस्थांनी नदीत उड्या घेतल्या. हा अनपेक्षित प्रकार पाहून आरोग्य पथकही घाबरले. तसेच ग्रामस्थांना नदीबाहेर विनवू लागले. मात्र हे ग्रामस्थ नदीबाहेर येण्यास तयार होईनात..

अखेर उपजिल्हाधिकारी राजीव शुक्ल आणि नोडल अधिकारी राहुल त्रिपाठी यांनी समजावल्यानंतर ग्रामस्थ नदीबाहेर आले. उपजिल्हाधिकाऱ्यांनी समजावल्यानंतर ग्रामस्थ लस घेण्यास तयार झाले. मात्र १५०० लोकसंख्या असलेल्या गावातील केवळ १४ जणांनीच लस घेतली.

Web Title: Corona vaccination: Fear of vaccine than corona! The villagers got frightened when they saw the vaccination team, jumped into the river and fled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.