शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
2
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
3
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
4
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
5
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
6
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
7
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
8
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
9
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
10
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
11
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
12
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
13
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

CoronaVaccination: ...तर भारताला ऑगस्टपासून रोज 90 लाख लोकांना द्यावी लागेल लस; असं आहे संपूर्ण गणित

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 3:31 PM

आतापर्यंत रोज देण्यात आले 15 लाख डोस, आता रोज टोचाव्या लागतील पाच पट अधिक लशी...

नवी दिल्ली - देशात कोरोना विषाणूच्या दुसर्‍या लाटेचा प्रादुर्भाव सुरूच आहे. कोरोना संक्रमणाला ब्रेक लावण्यासाठी कोरोना लसीकरण मोहिमेला वेग देण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. मात्र, यात लशीच्या तुटवड्याचा मोठा अडथळा निर्माण झाला आहे. केंद्र सरकारला आशा आहे, की पुढील महिन्यापासून कोरोना लसीची उपलब्धता वाढेल. जुलै महिन्यापासून 1 ते 44 वर्षांच्या लोकांसाठी लशीची कमतरता दूर होईल, असा सरकारचा अंदाज आहे. यानंतर डिसेंबर महिन्यापर्यंत संपूर्ण प्रौढ लोकसंख्येचे (जवळपास 94 कोटी) लसिकरण करण्याचे लक्ष आहे. तर जाणून घेऊया, सर्व जनतेचे लसीकरण करण्यासाठी केंद्राला रोज किती लोकांना लस टोचावी लागेल...

केंद्र सरकारने अंदाज लावला आहे, की ऑगस्ट ते डिसेंबर दरम्यान देशभरात 200 कोटी लशींचे डोस उपलब्ध होतील. यांच्या सहाय्याने 18 ते 44 वर्षे वयोगटातील लोकांचे वेगाने लसीकरण केले जाऊ शकेल. याचबरोबर सरकारने म्हटले आहे, की या वर्षाच्या अखेरीस 18 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या सर्व लोकांना लस दिली जाईल.

Corona Vaccine: भारत Pfizer कडून खरेदी करणार लशीचे 5 कोटी डोस? केंद्र-कंपनी यांच्यात सुरू आहे चर्चा

आतापर्यंत रोज देण्यात आले 15 लाख डोस -देशात 16 जानेवारीला सर्वात मोठी लसीकरण मोहीम सुरू  करून कोरोनाविरोधातील लढाईला सुरुवात करण्यात आली. आली. या मोहिमेला आज, शनिवारी चार महिने म्हणजेच 120 दिवस पूर्ण होत आहेत. या 120 दिवसांत भारतात आतापर्यंत जवळपसा 18 कोटी लशींचे डोस देण्यात आले आहेत. सरासरीचा विचार करता, भारताने आतापर्यंत एका दिवसात 15 लाख डोस टोचले आहेत.

गेल्या चार महिन्यांत लसीकरणाची गती मंदावली आहे. तरीही ही सरासरी 15 लाख एवढी आहे. आता पुन्हा एकदा लस टोचण्याचा वेग वाढताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात देशात एका दिवसात 17 लाख लशींचे डोस देण्यात आले. तसेच जुलै अखेरपर्यंत लशीचा पुरवठा वाढेल असा सरकारचा अंदाज आहे. 

स्पुतनिक-व्ही लस भारतात, ‘सिंगल डोस’ही लवकरच येणार; पुढील आठवड्यात बाजारात होणार उपलब्ध

रोज टोचाव्या लागतील पाच पट अधिक लशी -एका इंग्रजी वृत्तपत्राच्या म्हणण्याप्रमाणे, देशातील प्रौढ लोकसंख्या अंदाजे 94 कोटी एवढी आहे आणि या लोकसंख्येला लस देण्यासाठी 188 कोटी डोसची गरज भासेल. प्रौढ लोकांना लस देण्यासाठी वर्षाच्या उर्वरित 231 दिवसात 170 कोटी डोसची गरज असेल. म्हणजेच, आठवड्याचे सात दिवस जोडले तर रोज जवळपास 73.6 लाख डोस द्यावे लागतील. अर्थात, लसिकरणाचा आजचा वेग लक्षात घेता, रोज जवळपास पाच पट डोस द्यावे लागतील.

लसीकरणात भारत आपलाच विक्रम तोडणार -देशात रोज 90 लाख डोस टोचले जातील. आतापर्यंत कुठल्याही देशाने एका दिवसात याहून अर्ध्ये डोसही टोचलेल्या नाहीत. एका दिवसात सर्वाधिक लशी टोचण्याचा विक्रम भारताच्याच नावावर आहे. हा  विक्रम भारताने 5 एप्रिलला बनवला होता. तेव्हा एका दिवसात 41.6 लाख डोस टोचण्यात आले होते. मात्र, यासाठी केवळ सप्लायच नाही, तर लसीकरण केंद्र आणि मॅनपावरही अनेक पटीने वाढवावी लागेल. 

देशात लवकरच आणखी पाच लसी; चार लसींचे उत्पादन भारतात होणार, नीती आयोगाची माहिती

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस