Corona Vaccine: भारत Pfizer कडून खरेदी करणार लशीचे 5 कोटी डोस? केंद्र-कंपनी यांच्यात सुरू आहे चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 01:23 PM2021-05-15T13:23:27+5:302021-05-15T13:42:15+5:30

देशात कोरोनाने हाहाकार माजवला असतानाच हे वृत्त आले आहे. एढेच नाही, तर उत्तर प्रदेश आणि मुंबईसह इतरही काही राज्यांनीही लशी विकत घेण्यासाठी ग्लोबल टेंडर जारी करणार असल्याची घोषणा केली आहे.

Corona Vaccine Pfizer May Sell 50 million Vaccine Doses to India by Q3 | Corona Vaccine: भारत Pfizer कडून खरेदी करणार लशीचे 5 कोटी डोस? केंद्र-कंपनी यांच्यात सुरू आहे चर्चा

Corona Vaccine: भारत Pfizer कडून खरेदी करणार लशीचे 5 कोटी डोस? केंद्र-कंपनी यांच्यात सुरू आहे चर्चा

Next

नवी दिल्ली - अमेरिकन औषध निर्माता कंपनी फायझर (Pfizer) या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीपर्यंत देशात आपल्या लशीचे (Corona Vaccine) पाच कोटी डोस विकण्यासंदर्भात भारत सरकारसोबत चर्चा करत आहे. टाइम्स ऑफ इंडियाने म्हटल्याप्रमाणे, वरिष्ट सरकारी अधिकाऱ्यांनी अनेक बैठकांत Pfizer च्या वरिष्ठ अधिकाऱ्यासोबत लशीच्या उपलब्धतेसंदर्भात चर्चा केली आहे. (Corona Vaccine Pfizer May Sell 50 million Vaccine Doses to India by Q3)

इकोनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, सरकार आणि फायझर यांच्यातील ही चर्चा, कंपनीची लस वापरल्यानंतर कुठल्याही प्रकारचे साइड इफेक्ट आल्यास कंपनीकडून त्याची नुकसान भरपाई देण्याच्या मुद्द्यावर यशस्वी होण्याच्या उंबरठ्यावर आहे. ही लस इतर लशींच्या तुलनेत महागडी असून केवळ लसीकरण कार्यक्रमासाठीच सरकारकडून खरेदीकरिता उपलब्ध असेल. 

CoronaVirus News: यंदाचं वर्ष धोक्याचं, कोरोना अधिक जीवघेणा होणार; WHOकडून धोक्याचा इशारा

देशात कोरोनाने हाहाकार माजवला असतानाच हे वृत्त आले आहे. एढेच नाही, तर उत्तर प्रदेश आणि मुंबईसह इतरही काही राज्यांनीही लशी विकत घेण्यासाठी ग्लोबल टेंडर जारी करणार असल्याची घोषणा केली आहे. तसेच, युरोपियन मेडिसिन एजन्सीने (EMA) बुधवारी म्हटले आहे, की त्यांनी मंजुरी दिलेली mRNA लस महाराष्ट्रात आढळलेल्या नव्हा व्हेरिएंटचा सामना करण्यात सक्षम आहे.

EMA भारतीय व्हेरिएंटवर आलेल्या डेटाचा बारकाईने अभ्यास करत आहेत. त्यांनी म्हटले आहे, "आम्ही आश्वासक पुरावे पहात आहोत, की mRNA लस या व्हेरिएंटला निष्प्रभ करण्यात यशस्वी ठरेल." EMA ने फायझर, मॉडर्ना, एस्ट्राजेनेका आणि जे अँड जे लशीला मंजुरी दिली आहे. अमेरिकेने अद्यापही देशात तयार होणाऱ्या फायझर अथवा मॉडर्ना लशीला देशातील गरज पूर्ण होईपर्यंत निर्यातीची परवानगी दिलेली नाही.

Web Title: Corona Vaccine Pfizer May Sell 50 million Vaccine Doses to India by Q3

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.