हृदयद्रावक! आठ दिवसात कोरोनानं संपूर्ण कुटंबाला घेरलं; हसतं खेळतं कुटुंब बघता बघता नाहीसं झालं
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2021 18:03 IST2021-05-06T17:58:25+5:302021-05-06T18:03:44+5:30
Corona patient Death : आता या कुटुंबात फक्त एक चिमुरडा आणि त्याची आजी इतकेच लोक शिल्लक राहिले आहेत.

हृदयद्रावक! आठ दिवसात कोरोनानं संपूर्ण कुटंबाला घेरलं; हसतं खेळतं कुटुंब बघता बघता नाहीसं झालं
कोरोना व्हायरसनं संपूर्ण जगभरात थैमान घातलं आहे. इतकंच नाही तर या महामारीनं अनेक कुटुंब उद्धवस्त केली आहेत. दरम्यान एक मन हेलावून टाकणारी बातमी समोर येत आहे. उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधील एका कुटुंबावर ही दुर्दैवी वेळ आली आहे. कोरोनाच्या संक्रमणानं एक हसतं खेळतं कुटुंब होत्याचं नव्हतं झालं आहे. कोरोना व्हायरसनं पाहता पाहता सगळ्यांचाच बळी घेतला आता या कुटुंबात फक्त एक चिमुरडा आणि त्याची आजी इतकेच लोक शिल्लक राहिले आहेत.
बुलंदशहरमधील लक्ष्मीनगर कॉलनीत राहाणाऱ्या वकील धर्मराज सिंह यांची एका आठवड्यापूर्वी तब्येत खराब झाली होती. यानंतर नातेवाईकांनी त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केलं. ज्यावेळी चाचणी केली गेली, तेव्हा ते कोरोना पॉझिटिव्ह (Corona Positive) असल्याचं दिसून आलं.
अरे व्वा! टेक महिंद्रानं विकसित केलं कोरोनाचा खात्मा करणारं औषध; लवकरच पेटंट मिळणार
तीव्र लक्षणांसह श्वास घ्यायला त्रास होत असल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान 6 तासातच त्यांचा मृत्यू झाला. कुटुंबीय या धक्क्यातून सावरतच होते, तोपर्यंत धर्मराज यांच्या वहिनीलाही कोरोनानं आपले प्राण गमवावे लागले.
कोरोनाची सौम्य लक्षणं असल्यास चुकूनही करू नका CT-SCAN; एम्स संचालकांचा धोक्याचा इशारा
साधनावर अंत्यसंस्कार होतात तोच धर्मराज यांच्या विधवा सुनेचंही कोरोनानं निधन झालं. आता कुटुंबात केवळ धर्मराज यांची वृद्ध पत्नी सुषमा आणि तीन वर्षाचा नातू राहिला आहे. आता ३ वर्षांच्या नातवाला एकटं कसं सांभाळायचं हा सुषमा यांचा समोर मोठा प्रश्न आहे. याशिवाय लहानग्या नातवाशिवाय आता कोणताही आधार सुषमा यांना उरलेला नाही.