सावधान...! पुन्हा हातपाय पसरतोय कोरोना, मृतांचा आकडा 28 वर पोहोचला; सक्रिय रुग्णांचा आकडा 4000 च्या जवळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 13:49 IST2025-06-02T13:48:08+5:302025-06-02T13:49:28+5:30
Coronavirus Outbreak in India: आता देशातील सक्रिय रुग्णांचा आकडा 4000 च्या जवळपास जाऊन पोहोचला आहे.

सावधान...! पुन्हा हातपाय पसरतोय कोरोना, मृतांचा आकडा 28 वर पोहोचला; सक्रिय रुग्णांचा आकडा 4000 च्या जवळ
Coronavirus Outbreak: कोरोना व्हायरस पुन्हा एकदा देशभरात हात-पाय पसरताना दिसत आहे. आता देशातील सक्रिय रुग्णांचा आकडा 4000 च्या जवळपास जाऊन पोहोचला आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारी नुसार, रविवारपर्यंत सक्रीय रुग्णांची संख्या 3758 एवढी होती. तर मृतांचा आकडा 28 एवढा होता. दिल्लीचा विचार करता, दिल्लीतील सक्रीय रुग्णांची संख्या 436 वर पोहोचली आहे. येथे 61 रुग्ण वाढले आहेत. तसेच, उत्तर प्रदेशातील सक्रीय रुग्ण संख्या 149 तर महाराष्ट्रातील सक्रीय रुग्ण संख्या 506 एवढी आहे.
महाराष्ट्रातही कोरोना रुग्ण संख्या वाढताना दिसत आहे. आरोग्य विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार, रविवारी राज्यात कोरोनाचे ६५ नवीन रुग्ण आढळले. यांपैकी मुंबईत २२ रुग्ण, पुण्यात २५, ठाण्यात ९, पिंपरी-चिंचवडमध्ये ६, कोल्हापुरात २ तर नागपुरात एक रुग्ण आढळला आहे. यातच दिलासादायक गोष्ट म्हणजे, राज्यात ३०० रुग्ण बरेही झाले आहेत. सध्या, सक्रिय कोरोना रुग्णांची एकूण संख्या 506 वर पोहोचली आहे.
राजस्थानातही वाढतायत रुग्ण -
राजस्थानातही कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढताना दिसत आहेत. राज्यात गेल्या २४ तासांत २० नवीन रुग्ण आढळले. नवीन रुग्णांपैकी १७ जण राजधानी जयपूरमधील आहेत. तर उदयपूर, बिकानेर आणि डुंगरपूरमधील प्रत्येकी एक आहेत. नवीन रुग्णांमध्ये ७४ आणि ८२ वर्षे वयोगटातील दोन वृद्धांचा समावेश आहे. याशिवाय १९ ते ३० वर्षे वयोगटातील ७ तरुणांचा समावेश आहे. २० नवीन रुग्णांसह, राजस्थानमध्ये आतापर्यंत ९८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी एका संक्रमिताचा मृत्यू झाला आहे. तर १५ रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.