शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना, लाॅकडाऊनच्या भीतीसोबत मजुरांअभावी बांधकामे रखडली, मजूर गावी परतत असल्याचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 05:06 IST

Corona, lockdown : बांधकामांची मदार पूर्णत: स्थलांतरित मजुरांवर असते. गेल्या पंधरा दिवसांपासून लॉकडाऊनची भीती सतावत आहे. यामुळे स्थलांतरित मजूर गावी परतल्याने अशा मजुरांची संख्या जवळपास २० टक्के कमी होऊ शकते.

- नितीन अग्रवाल

नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या उद्रेकाने महाराष्ट्रास देशभरातील अन्य भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने लॉकडाऊन लागण्याच्या शक्यतेने विकास कामे रखडली आहेत. रात्रीच्या संचारबंदीमुळे दिवसाच काम होत आहे. शिवाय स्थलांतरित मजूर आपापल्या गावी परतत असल्याने मजुरांची संख्याही रोडावल्याने बांधकामाची गतीही मंदावली आहे. त्यामुळे नियोजित प्रकल्पांचे काम पूर्ण होण्यास दिरंगाई होऊ शकते.राजधानी दिल्लीत बांधकामावरील मजुरांची संख्या १५ ते २० टक्क्यांनी घटली आहे. दिल्लीत विविध विकास कामे करणाऱ्या एका खाजगी कंपनीच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आमच्या तीन प्रमुख परिसरातील कामाची गती आधीच्या तुलनेत ४० ते ५० टक्के कमी झाली आहे. संचारबंदीमळे एका पाळीत काम होत आहे.बांधकामांची मदार पूर्णत: स्थलांतरित मजुरांवर असते. गेल्या पंधरा दिवसांपासून लॉकडाऊनची भीती सतावत आहे. यामुळे स्थलांतरित मजूर गावी परतल्याने अशा मजुरांची संख्या जवळपास २० टक्के कमी होऊ शकते.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका अधिकाऱ्यानुसार मजुराच्या कमतरतेमुळे दिल्ली मेट्रोसह अनेक प्रमुख बांधकामावर परिमाण झाला आहे. कोरोनाबाधित होऊ, अशी मजुरांना भीती आहेच; परंतु, मागच्या वर्षी अचानक लॉकडाऊन लागू करण्यात आल्याप्रमाणे अडकण्याची जास्त भीती सतावत आहे. त्यामुळे बहुतांश मजूर आपापल्या गावी परतत आहेत. ते लवकर परतील, अशी आशा आहे.मजुरांअभावी सार्वजनिक दृष्ट्या महत्वाच्या कामांवर मोठा परिणाम झाला आहे. यापैकी अंतिम टप्प्यात पोहोचलेला आश्रम अंडरपास, बेनिता-हुआरेज अंडरपास, शाहदरा दक्षिण विभागाच्या मुख्यालयाच्या बांधकामाचा यात समावेश आहे. याशिवाय प्रगती मैदान भुयाराच्या कामाची गतीही मंदावली आहे. या कामाची मुदत आधीच सहा वेळा वाढविण्यात आली. आता उर्वरित काम जून ऐवजी ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होऊ शकते.

नजीकच्या काळात समस्या वाढणारया कामाशी संबंधित एका अधिकाऱ्याने सांगितले की, मोठ्या संख्येने गावी गेलेल्या मजुरांना माघारी आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. दिल्ली मेट्रो चौथ्या टप्प्यातील तीन कॉरिडोर आणि त्रिलोकपुरी पिंक लाईन, पंजाबी बागेत इंटरचेंज स्टेशनच्या फुटओव्हर पुलाचे काम चालू आहे. मजुरांची संख्या कमी झाल्याने नजीकच्या काळात समस्या वाढू शकतात. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMetroमेट्रो