हमारी अधुरी कहाणी! "तू माझ्या हृदयाच्या जवळ...", रूळावर सापडली संपलेली 'लव्ह स्टोरी'
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2023 17:12 IST2023-06-05T17:12:03+5:302023-06-05T17:12:28+5:30
odisha train accident news in marathi : ओडिशाच्या बालासोर येथील रेल्वे दुर्घटनेने सर्वांच्या डोळ्यात पाणी आले.

हमारी अधुरी कहाणी! "तू माझ्या हृदयाच्या जवळ...", रूळावर सापडली संपलेली 'लव्ह स्टोरी'
Odisha Train Accident : ओडिशाच्या बालासोर येथे झालेल्या रेल्वेअपघातानं अवघ्या जगाच्या डोळ्यात पाणी आणलं. या हृदयद्रावक घटनेनं अनेकांचं संसार मोडलं, काहींच्या पोटचा लेक तर कुणाचा 'बाप' हिरावला. अंगावर काटा आणणाऱ्या या दृश्यांनी सर्वांनाच संभ्रमात टाकलं. हा अपघात म्हणजे एक वाईट स्वप्न म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. आजही यावर विश्वास ठेवणं कठीणच... खरं तर या अपघातानं एका प्रेमकहाणीचा देखील अंत झाला आहे, ज्याचे फोटो समोर आले आहेत. मृत व्यक्तीची डायरी रूळावर सापडली असून यामध्ये बंगाली भाषेत प्रेमाच्या कविता लिहल्या आहेत.
दरम्यान, एका डायरीची पानं रूळावर सर्वत्र पडली होती. यामधील काही पानांवर मासे, सूर्य आणि हत्ती यांचे फोटो काढून प्रेम व्यक्त केले होते. एका प्रवाशाने त्याच्या सुट्ट्यांमध्ये आपल्या प्रेमाच्या नावाने हे सर्व रेखाटलं असल्याचं बोललं जात आहे. मात्र, या प्रवाशाबाबत अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.
"मला तुझ्यावर प्रत्येक क्षणी प्रेम प्रेम करायचंय"
या पानांमध्ये बंगाली भाषेत काही चारोळ्या लिहल्या आहेत. "मला तुझ्यावर प्रत्येक क्षणी प्रेम करायचं आहे, तू माझ्या हृदयाच्या जवळ आहेस", असं बंगाली भाषेत लिहलेल्या कवितेत नमूद आहे. प्रेमाच्या या चारोळ्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहेत. स्थानिक पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या पानांना सांभाळून ठेवण्यात आले असून ही कोणी लिहली आहे याचा देखील शोध लागू शकला नाही.
२ जून रोजी झालेल्या या अपघातानं अनेकांना धक्का बसला. तब्बल २७५ जणांना जीव गमवावा लागला, तर १ हजारहून अधिक जण जखमी आहेत. बालेश्वर, कटक आणि भुवनेश्वर येतील इस्पितळात जखमींवर उपचार सुरू आहेत.