शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
2
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
3
उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर भेट, राज ठाकरेंचे ट्वीट; महायुतीला इशारा की समीकरणाचे सूचक संकेत?
4
Mahadevi Elephant: अखेर 'महादेवी' हत्तीणीला निरोप देताना गावकऱ्यांना अश्रू अनावर; नांदणीत लोटला जनसागर
5
आणखी स्वस्त होणार कर्ज; ऑगस्टमध्ये पुन्हा एकदा रेपो दरात RBI कपात करण्याची शक्यता
6
माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली...
7
Nag Panchami 2025: नागपंचमी का साजरी केली जाते, यामागील पौराणिक कथा वाचलीत का?
8
"पहलगाम दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या सैन्याला सॅल्यूट, हल्ला करणारे १०० वेळा विचार करतील"
9
चीनचा भारताला मोठा 'धक्का'! 'रेअर अर्थ' बंदीमुळे 'या' ५ क्षेत्रांवर थेट परिणाम, SBI चा गंभीर इशारा!
10
"TCS मधील कपात तर सुरुवात आहे, अजून अनेक कंपन्यांमध्ये AI चा फटका बसणारे"
11
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
12
२५ वर्षीय CA तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; 'हेलियम गॅस' शरीरात घेत आयुष्याचा शेवट केला, कारण...
13
Stock Market Today: सलग तिसऱ्या दिवशी शेअर बाजारात विक्रीचा सपाटा, Sensex २७१ अंकांनी घसरला; IT-मेटल स्टॉक्स कमकुवत
14
"सलमानने चाकू माझ्या गळ्यावर धरला आणि जोरात...", अशोक सराफ यांनी सांगितला भाईजानचा तो प्रसंग
15
भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात
16
FD-RD झाली जुनी, आता ‘या’ ५ स्कीम्सची चर्चा; वर्षभरात तगडा नफा हवा असेल तर ही डिटेल्स तपासा
17
'सैयारा'साठी 'या' रिअल लाईफ जोडीला होती ऑफर, मोहित सूरींनी बदलला निर्णय; कारण...
18
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
19
"तुझे ओठ सेक्सी आहेत, किस करू?", असित मोदींवर TMKOC फेम अभिनेत्रीचे गंभीर आरोप
20
"तो मला टॉर्चर करतोय"; पत्नीच्या पोलीस तक्रारीनंतर पती घरातून पळाला, पण त्यानंतर जे घडलं...

Conversion Case: मूकबधिरांना मुस्लीम करून बनवायचं होतं दहशतवादी; झाले 'असे' खुलासे, की अधिकारीही हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2021 19:45 IST

UP conversion case : मूक-बधीर विद्यार्थ्यांचे धर्मांतरण करणे आणि नंतर त्यांना दहशतवादी संघटनांत सामील करून घेणे, असा पाकिस्तानातील गुप्तचर संस्था आयएसआयचा हेतू होता.

लखनौ - धर्मांतरण प्रकरणात अटक करण्यात आलेल्या उमर गौतम आणि जहांगीर आलम यांची एटीएसकडून कसून चौकशी सुरू आहे. चौकशीत रोजच्या रोजच नव-नवे खुलासे होत आहेत. एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फंडिंगसंदर्भात उमरने काही महत्वाची माहिती दिली आहे. त्याचा तपास सुरू आहे. याशिवाय उमर, ज्या-ज्या संस्थांशी संबंधित आहे, त्या संस्थांचीही चौकशी सुरू आहे. (UP conversion case  Deaf and dumb wanted to be made terrorists after converting to islam)

चौकशीनंतर अनेक ठिकांनांची पडताळणी केली जात आहे. याप्रकरणी यूपी एटीएस नोएडातूनही माहिती मिळवू शकते. एटीएसने गुरुवारी एनसीआरच्या विविध शहरांत तपास आणि चौकशी केल्याचेही समोर येत आहे.

मूक-बधीर विद्यार्थ्यांचे धर्मांतरण करणे आणि नंतर त्यांना दहशतवादी संघटनांत सामील करून घेणे, असा पाकिस्तानातील गुप्तचर संस्था आयएसआयचा हेतू होता. याच कटांतर्गत दहशतवादी शिबिरांत ट्रेनिंग देण्याची तयारीही केली जात होती. यासंदर्भात महत्वाची माहितीही एटीएसच्या हाती लागली असल्याचे समजते.

‘आदित्य’चा बनला अब्दुल! हिंदू धर्माकडून त्याला हवीत ‘या’ ७ प्रश्नांची उत्तरं; आईवडिलांसमोर धर्मसंकट  आयएसआयच्या आदेशानुसार, विविध दहशतवादी संघटनांनी धर्मांतरण सिंडीकेट लोकांना मोठ्या प्रमाणावर मदतही केली आणि अधिकाधिक धर्मातरण करायला सांगितले होते. महत्वाचे म्हणजे, अटक करण्यात आलेल्या मौलाना उमर गौतमकडे याची धुरा देण्यात आली होती. कटानुसार, या मूक-बधीर मुलांचे धर्मांतरण करून, त्यांना मुसलमान करून कट्टरपंथी बनवायचे होते. ते मुस्लीम झाल्यानंतर त्यांना दहशतवादी संघटनांमध्ये पाठविण्यात येणार होते. नोएडा डेफ सोसायटीतील काही विद्यार्थ्यांचे धर्मांतरण केल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, दिल्ली-एनसीआरचमधील 6 हून अधिक मूक-बधीर शाळा आणि ट्रेनिंग सेंटर्स या सिंडीकेटच्या पहिल्या टप्प्यात निशाण्यावर होते. या सर्व कंगोऱ्यांचा तपास एटीएसची टीम करत आहे. यासंदर्भात अमर उजाला या वृत्त संस्थेने वृत्त प्रसिद्ध केले आहे. नोएडा डेफ सोसायटीतील 16 हजार विद्यार्थ्यांना मिळाले रोजगार प्रशिक्षण -नोएडा डेफ सोसाइटीच्या संचालक रूमा रोका यांनी दिलेल्या माहितीमुसार, ही सोसायटी 2005 पासून सुरू आहे आणि दोन रूमच्या फ्लॅटपासून हीची सुरुवात झाली होती. 16 वर्षांच्या काळात देशभरातील 16 हजारहून अधिक मूक-बधीर विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना रोजगारासाठी प्रशिक्षण आणि ट्रेनिंग देण्यात आले आहे. 

Religious conversion case: 1000 हून अधिक लोकांचे धर्मांतरण! योगी सरकारची स्ट्रिक्ट अ‍ॅक्शन, दिले मोठे आदेश  शेकडो मूक-बधीर विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मल्टीनॅशनल कंपन्यांपासून ते मोठ्या औद्योगिक घराण्यांत काम करत आहेत. आम्ही नि:स्वार्थपणे यांना सक्षम बणविण्याचे काम करत आहोत. मात्र, काही लोकांमुळे हतबल आहोत आणि त्याच लोकांच्या चुकीच्या हेतूमुळे हे सर्व बघावे लागत आहे. आम्ही देशातील वंचित लोकांना सक्षम बनविण्यासाठी काम करत आहोत.