ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2025 08:10 IST2025-05-19T08:09:50+5:302025-05-19T08:10:39+5:30
या प्रकरणात पोलिस प्रशासन व स्थानिक अधिकाऱ्यांसोबत सहकार्य करणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले. राज्य महिला आयोगानेदेखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
सोनीपत : हरयाणाच्या सोनीपत येथील खासगी विद्यापीठाच्या एका प्राध्यापकाला ऑपरेशन सिंदूरबद्दल सोशल मीडियावर वादग्रस्त व्यक्तव्य केल्याप्रकरणी पोलिसांनी दिल्लीतून रविवारी सकाळी अटक केली. अली खान महमूदाबाद असे अशोका विद्यापीठाच्या सहयोगी प्राध्यापकाचे नाव आहे. भाजप युवा मोर्चाच्या एका नेत्याने तक्रार दिल्यामुळे या प्राध्यापकावर कारवाई केल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
या प्रकरणात पोलिस प्रशासन व स्थानिक अधिकाऱ्यांसोबत सहकार्य करणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाने सांगितले. राज्य महिला आयोगानेदेखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.
पाकिस्तानसाठी हेरगिरीप्रकरणी हरयाणात तरुणाला अटक
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली हरयाणाच्या नूह जिल्ह्यात २६ वर्षीय अरमानला शनिवारी अटक करण्यात आली, असे पोलिसांनी सांगितले. स्थानिक न्यायालयाने अरमानला सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. केंद्रीय तपास संस्थांकडून माहिती मिळाल्यानंतर अरमानला अटक करण्यात आली.