शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
2
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
3
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
4
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
5
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
6
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
7
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
8
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
9
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
10
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
11
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
12
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
13
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
14
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
15
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
16
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
17
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
18
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
20
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
Daily Top 2Weekly Top 5

कामात निष्काळजीपणा करणार्‍या ठेकेदारालाच पुन्हा ठेका कारावाई करण्याची झाली होती शिफारस : स्थायी समितीची मंजुरी

By admin | Updated: July 7, 2015 22:56 IST

पुणे : शहरामध्ये घराघरात जाऊन औषध फवारणी करण्यासाठी कामगार पुरविण्याच्या कामात निष्काळजी केल्याप्रकरणी अनेक तक्रारी झालेल्या ठेकेदारालाच पुन्हा कामगार पुरविण्यासाठी ४२ लाख ५० हजार रूपयांच्या ठेक्यास स्थायी समितीने मंजूरी दिली आहे. संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याचा शिफारस झालेली असतानाही त्याला पुन्हा काम देण्यात आले आहे.

पुणे : शहरामध्ये घराघरात जाऊन औषध फवारणी करण्यासाठी कामगार पुरविण्याच्या कामात निष्काळजी केल्याप्रकरणी अनेक तक्रारी झालेल्या ठेकेदारालाच पुन्हा कामगार पुरविण्यासाठी ४२ लाख ५० हजार रूपयांच्या ठेक्यास स्थायी समितीने मंजूरी दिली आहे. संबंधित ठेकेदारावर कारवाई करण्याचा शिफारस झालेली असतानाही त्याला पुन्हा काम देण्यात आले आहे.
शहरात साथीचे रोग पसरू नये म्हणून घरोघर जाऊन ॲबेट या औषधाची फवारणी केली जाते. साधरणत: जुलै ते ऑक्टोबर या ४ महिन्यांच्या कालावधीसाठी ठेकेदारामार्फत १५० कंत्राटी कामगार घेतले जातात. यंदाच्या २०१५-१६ या वर्षाकरिता दिशा एजन्सी व श्री एंटरप्रायझेस या दोन ठेकेदारांना प्रत्येकी ४२ लाख ५० हजार असे ८५ लाख रूपयांच्या टेंडरच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
दिशा एजन्सीच्या ठेकेदाराचे काम व्यवस्थित नसल्याने त्याच्याविरूध्द कारवाई करण्याचा प्रस्ताव ३ जून २०१४ रोजी ठेवण्यात आलेला आहे. या ठेकेदाराने कामगारांना वेळेवर पगार दिला जात नाही. क्षेत्रिय कार्यालयांतर्गत किती कामगार कार्यरत आहेत, याची माहितीच ठेकेदाराला नाही. कामगाराने दररोज फवारणी करण्यासाठी दिलेल्या घरांचे टार्गेट पूर्ण केले जात नाही अशा प्रकारच्या तक्रारी आरोग्य प्रमुखांकडे करण्यात आल्या होत्या. त्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी असा शेराही आरोग्य प्रमुखांनी दिला होता. मात्र यंदा औषध फवारणीसाठी टेंडर मंजूर करताना पुन्हा त्याच ठेकेदारासह दोघांचे टेंडर आरोग्य विभागाने मंजूर केले आहे.

चौकट
कृती अहवाल मागविला
पावसाळाच्या पार्श्वभुमीवर औषध फवारणीचे काम तातडीने सुरू होणे आवश्यक असल्याने या टेंडरला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र ठेकेदाराकडून काय काम केले जाणार आहे, ते योग्य पध्दतीने होण्यासाठी काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत याचा सविस्तर अहवाल ठेवण्यास प्रशासनाला सांगण्यात आले आहे.
- अश्विनी कदम, अध्यक्ष, स्थायी समिती
............

चौकट
कामाची तपासणीच होत नाही
ठेकेदाराकडील कंत्राटी कामगारांकडून प्रत्येक घरात जाऊन औषध फवारणी होणे आवश्यक आहे, मात्र फवारणीचे काम व्यवस्थित होत नसल्याने शहरामध्ये डेंग्यू, चिकनगुनिया या साथी मोठयाप्रमाणात पसरतात. या कामगारांकडून व्यवस्थित काम केले जाते का याची कोणतीही नोंद ठेवली जात नाही, तसेच त्याची तपासणीही होत नाही. त्यामुळे औषध फवारणीच्या कामावर लाखो रूपये खर्च करूनही साथीच्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे.
..............