शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

...तर राहुल गांधींनी इटलीला निघून जावं; साक्षी महाराजांचं खुलं आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2018 7:31 PM

उन्नवमधून लोकसभा निवडणूक लढवण्याचं आव्हान

लखनऊ: वादग्रस्त विधानांनी चर्चेत राहणारे भाजपा खासदार साक्षी महाराज यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना खुलं आव्हान दिलं आहे. राहुल गांधींनी उन्नवमधून लोकसभा निवडणूक लढवावी, असं आव्हान साक्षी महाराज यांनी दिलं. राहुल गांधींनी माझ्याविरोधात लोकसभेची निवडणूक लढवून दाखवावी. यामध्ये जो कोणी पराभूत होईल, त्यानं राजकारण सोडावं, असं साक्षी महाराज म्हणाले. ते हिंदी वृत्तवाहिनी 'आज तक'सोबत बोलत होते.साक्षी महाराज उत्तर प्रदेशातील उन्नव मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व करतात. याच मतदारसंघातून निवडणूक लढवून दाखवण्याचं आव्हान त्यांनी राहुल गांधींना दिलं आहे. 'राहुल गांधींनी माझ्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवून दाखवावी. यामध्ये जो पराभूत होईल, त्यानं राजकारण सोडावं लागेल,' असं साक्षी महाराज म्हणाले. 'राहुल गांधींनी मला पराभूत केल्यास, मी राजकारणातून संन्यास घेईन आणि राहुल गांधींचा पराभव झाल्यास त्यांनी इटलीला निघून जावं,' असंदेखील त्यांनी म्हटलं. माझ्याविरोधात निवडणूक लढवल्यास राहुल यांचा पराभव निश्चित असेल, असा विश्वासदेखील त्यांनी व्यक्त केला. राहुल गांधी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बेछूट आणि तथ्यहीन आरोप करत आहेत, असं साक्षी महाराज म्हणाले. 'पंडित नेहरुंनी फक्त चोरी केली, दरोडे टाकले. त्याशिवाय त्यांनी काहीच केलं नाही. त्यांना संपूर्ण देश उद्ध्वस्त केला. फाळणी झाल्यानंतर देशाला उद्ध्वस्त करण्यात नेहरु आणि त्यांच्या कुटुंबाचा मोठा वाटा आहे,' अशी टीका साक्षी महाराजांनी केली.  

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSakshi Maharajसाक्षी महाराजBJPभाजपाcongressकाँग्रेसUttar Pradeshउत्तर प्रदेश