शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

नीलपर्वतावर १०८ फूट उंच त्रिशूलाची उभारणी बुधवारी समर्पण सोहळा: सोलापूरच्या सद्गुरू सेवा प्रतिष्ठानचा उपक्रम

By admin | Updated: September 3, 2015 23:05 IST

सोलापूर: सद्गुरु सेवा प्रतिष्ठान, सोलापूर यांच्या वतीने शिपलागिरी महाराजांची इच्छापूर्ती आणि स्मृतिप्रीत्यर्थ त्र्यंबकेश्वर, नीलपर्वत जुन्या आखाड्यासमोर १०८ फूट उंचीचा ३ हजार किलो वजनाचा भव्य त्रिशूल उभारण्यात आला आहे. त्याचा समर्पण सोहळा ९ सप्टेंबर २०१५ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.

सोलापूर: सद्गुरु सेवा प्रतिष्ठान, सोलापूर यांच्या वतीने शिपलागिरी महाराजांची इच्छापूर्ती आणि स्मृतिप्रीत्यर्थ त्र्यंबकेश्वर, नीलपर्वत जुन्या आखाड्यासमोर १०८ फूट उंचीचा ३ हजार किलो वजनाचा भव्य त्रिशूल उभारण्यात आला आहे. त्याचा समर्पण सोहळा ९ सप्टेंबर २०१५ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.
या सोहळ्यास आखाडा प्रमुख श्री महंत हरिगिरीजी महाराज (आंतरराष्ट्रीय महामंत्री), श्री महंत श्री प्रेमगिरीजी महाराज (आंतरराष्ट्रीय मंत्री), श्री नारायणगिरीजी महाराज यांच्या हस्ते होणार आहे. मोहोळ तालुक्यातील देगाव (वाळूज) येथे श्री गुरुदेव सिद्धाश्रम आहे. या ठिकाणी दर अमावस्येला होमहवन केला जातो. असंख्य भक्तगण दर्शनाचा लाभ घेतात. या ठिकाणी श्री शिपलागिरी महाराजांची समाधी आहे. श्री श्री श्री १००८ ब्रšालीन महंत श्री शिपलागिरी महाराज हे २५ मे २०१२ रोजी तीर्थयात्रा चालू असताना कुरुक्षेत्र येथे त्यांनी देह सोडला. शिपलागिरी महाराज हे पंचदशनाम, जुना आखाडा त्र्यंबकेश्वर येथे विविध पदांवर होते. १९९० च्या कुंभमेळ्याचे ते अध्यक्ष होते.
शिपलागिरी महाराज यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्र्यंबकेश्वर, नीलपर्वत, जुन्या आखाड्यासमोर १०८ फूट उंचीचा भव्य त्रिशूल उभारला आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे अध्यक्ष अमित शहा, महंत श्री हरिगिरीजी महाराज, साधू-संत व सद्गुरु सेवा प्रतिष्ठानचे सदस्य, महाराजांचे भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या भव्य त्रिशूलाचा उद्घाटन सोहळा बुधवारी (दि. ९ सप्टेंबर) होत आहे. या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन सद्गुरु सेवा प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)