पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2025 06:59 IST2025-08-02T06:58:03+5:302025-08-02T06:59:28+5:30

कॉन्स्टेबल मुनीर अहमद याला बरखास्त करण्याच्या निर्णयाचे समर्थन करत, ही कृत्ये राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करू शकतात, असे सीआरपीएफने म्हटले आहे.

constable marriage to pakistani girl poses threat to national security crpf clarifies in court | पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण

पाकच्या मुलीशी कॉन्स्टेबलचा विवाह राष्ट्रीय सुरक्षेला धोका; सीआरपीएफचे कोर्टात स्पष्टीकरण

सुरेश एस. डुग्गर, लोकमत न्यूज नेटवर्क, जम्मू: कॉन्स्टेबल मुनीर अहमद याला बरखास्त करण्याच्या आपल्या निर्णयाचे समर्थन करताना सीआरपीएफने जम्मू-काश्मीर उच्च न्यायालयात त्याचा पाकिस्तानी मुलीशी गुप्त विवाह, बनावट दस्तावेज व संवेदनशील माहिती लपवण्यासारख्या गंभीर कृत्यांचा हवाला दिला. ही कृत्ये राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण करू शकतात, असे म्हटले आहे.

सीआरपीएफने म्हटले की, मुनीर अहमदने त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिल्याशिवाय फेब्रुवारी २०२५मध्ये पर्यटक व्हिसावर भारतात आलेली पाकिस्तानी नागरिक मेनल खानशी विवाह केला होता. त्याने विवाहाची बाब लपवली व विवाहाच्या कागदपत्रांवर बनावट हस्ताक्षरही केले. 

मेनल खानचा व्हिसा संपल्यावर अधिकाऱ्यांना माहिती न देता तिच्या दीर्घकालिक व्हिसासाठी अर्ज करण्यात मदत केली. पहलगाम अतिरेकी हल्ल्यानंतर तो सुटीवर गेला. तो त्याच्या पदामुळे संवेदनशील ठिकाणी जाऊ शकत होता, लष्कराच्या हालचालीसंबंधी माहिती घेऊ शकत होता. त्याच्या कृत्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येऊ शकली असती. मुनीर अहमद याने त्याच्या बरखास्तीला आव्हान दिले आहे. आपले स्वच्छ रेकॉर्ड, विवाहाबाबत सीआरपीएफ अधिकाऱ्यांशी संवाद, पत्नीच्या व्हिसा नियमितीकरणासाठी भाजप खासदारांच्या पत्रांचा हवाला दिला आहे. 

 

Web Title: constable marriage to pakistani girl poses threat to national security crpf clarifies in court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.