शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
3
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
4
'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
5
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
6
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
7
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
8
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
9
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
10
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
11
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
12
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
13
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
14
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
15
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
16
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
17
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
18
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
19
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
20
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

मोदींना बदनाम करण्याचा होता कट

By admin | Updated: March 11, 2016 03:15 IST

इशरत जहाँप्रकरणी प्रतिज्ञापत्र बदलण्यामागे गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्याचा यापूर्वीच्या संपुआ सरकारचा कट होता

नवी दिल्ली : इशरत जहाँप्रकरणी प्रतिज्ञापत्र बदलण्यामागे गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि देशाचे विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्याचा यापूर्वीच्या संपुआ सरकारचा कट होता, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत गुरुवारी केला आणि या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल,असेही स्पष्ट केले.इशरत ही लष्कर-ए-तोयबा या संघटनेची दहशतवादी होती, असे प्रथम सांगण्यात आले होते. नंतर सरकारने दुसरे प्रतिज्ञापत्र सादर करून आपली भूमिका बदलली. ही दोन्ही प्रतिज्ञापत्रे कुठल्या परिस्थितीत सादर करण्यात आली याची गृहमंत्रालय चौकशी करीत आहे, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी सांगितले. या प्रकरणातील काही दस्तावेज गहाळ झाले आहेत. परंतु मंत्रालय स्तरावर अंतर्गत शोध मोहीम सुरू असून यासंदर्भात पुरावे गोळा करण्यात येत आहेत असेही ते म्हणाले. लोकसभेत काही सदस्यांनी लक्षवेधीद्वारे इशरत जहाँप्रकरणी प्रतिज्ञापत्रात कथित बदलासंदर्भात लक्षवेधी दाखल केली होती. त्यावरील चर्चेला गृहमंत्र्यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, इशरत ही लष्कर-ए-तोयबाची दहशतवादी होती हे लपवून ठेवण्याचा प्रयत्न तत्कालीन संपुआ सरकारने केला. आपल्या पहिल्या प्रतिज्ञापत्रात सरकारने हे स्वीकारले होते. पण महिनाभरानंतर प्रतिज्ञापत्र बदलण्यात आले. मुंबई हल्ल्यातील आरोपी डेव्हिड हेडली याच्या साक्षीमुळेही इशरतचे लष्करशी संबंध होते हे सिद्ध झाले आहे. दहशतवादाच्या मुद्यावर राजकारण होऊ नये असे आवाहन करतानाच या समस्येकडे कदापि दुर्लक्ष केले जाणार नाही, अशी ग्वाही राजनाथसिंग यांनी दिली. (लोकमत न्यूज नेटवर्क)