शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी 200 कोटींची जमीन 3 कोटीत घेतली" , वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
4
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
5
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
6
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
7
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
8
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
9
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
10
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
11
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
12
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
13
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
14
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
15
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज
16
लेख: १०० रुपयांचे पाणी, ७०० रुपयांची कॉफी! मल्टिप्लेक्सच्या लूटमारीवर न्यायालयाची नाराजी
17
आठवडाभरात सर्व घरे जमीनदाेस्त! ठाणे-बोरीवली टनेलच्या कामाला वेग; मागाठाणेत झोपड्या हटवल्या
18
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
19
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
20
एशियाटिक साेसायटीची निवडणूक अनिश्चित काळासाठी पुढे ढकलली; सदस्य मुद्द्यावरून होता गोंधळ

भाजपच्या ५० बंडखोरांवर काँग्रेसचे लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2018 03:34 IST

आगामी २०१९ च्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसने विरोधी पक्षांसोबत आघाडीचे प्रयत्न वाढविले असतानाच भाजपच्या त्या संसद सदस्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे ज्यांना पुढील निवडणुकीत भाजपकडून खाली हात ठेवले जाण्याची शक्यता आहे.

- संतोष ठाकूरनवी दिल्ली : आगामी २०१९ च्या निवडणुकीपूर्वी काँग्रेसने विरोधी पक्षांसोबत आघाडीचे प्रयत्न वाढविले असतानाच भाजपच्या त्या संसद सदस्यांवर लक्ष केंद्रीत केले आहे ज्यांना पुढील निवडणुकीत भाजपकडून खाली हात ठेवले जाण्याची शक्यता आहे. अशा संभाव्य उमेदवारात सर्वाधिक उत्तरप्रदेशातील संसद सदस्य आहेत. एवढेच नाही, तर काँग्रेस आपल्याकडून फायरब्रँड वक्ते आणि माजी केंद्रीय आरोग्यमंत्री शत्रुघ्न सिन्हा, माजी क्रिकेटपटू कीर्ति आझाद यांच्याही संपर्कात आहे. जेणेकरुन काँगे्रस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या मिशन २०१९ ला ताकद मिळू शकेल.बिहार हे राज्य जागा आणि राजकीयदृष्ट्या महत्वाचे आहे. त्यामुळे काँग्रेसचा असा प्रयत्न आहे की, भाजपाने बाजूला केलेले कीर्ति आझाद आणि शत्रुघ्न सिन्हा यांनी आमच्यासोबत येऊन निवडणूक लढवावी. शत्रुघ्न सिन्हा यांना त्यांच्या सध्याच्या जागेवरुनच निवडणूक लढविण्यास सांगितले जाऊ शकते. जर शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढविली तर, अशी शक्यता आहे की, त्यांच्यासमोर जदयूच्यावतीने उमेदवार दिलाजाणार नाही.सिन्हा यांची जदयूतही चांगली मैत्री आहे. त्यांनी जाहीरपणे नितीशकुमार यांचे समर्थन त्यावेळीही केलेले आहे जेव्हा ते भाजपपासून वेगळे राजदसोबत होते. एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, शत्रुघ्न सिन्हा पक्षात आले तर काँग्रेसला केवळ मजबूतीच मिळणार नाही तर, एक चांगला वक्ताही मिळेल. शत्रुघ्न सिन्हा काँग्रेसकडून निवडणूक लढू शकतात काय? या प्रश्नावर शत्रुघ्न सिन्हा यांनी संसदेच्या बाहेर बोलताना स्पष्ट केले होते की, याबाबत आपण एवढेच म्हणू, ... खामोश. निवडणूक आल्यानंतर आपण स्वत: हे सांगू की, कोणत्या पक्षाकडून मैदानात उतरणार आहोत.भाजपाचे निलंबित संसद सदस्य कीर्ति आझाद हेही काँग्रेसकडून निवडणूक लढविण्याची शक्यता आहे. त्यांचे वडील भगवत झा आझाद बिहारचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याविरुद्ध उघडपणे बोेलणाऱ्या आझाद यांच्याविरुद्ध भाजपाच्यावतीने जदयूच्या एका आमदाराला उतरविले जाण्याची शक्यता आहे. असे सांगितले जात आहे की, कीर्ति आझाद हेही नवज्योतसिंग सिद्धू यांच्याप्रमाणे काँग्रेससोबत नवी इनिंग सुरु करतील. याबाबत काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले की, काँग्रेस त्यांचे नैसर्गिक घर आहे. आम्ही कीर्ति आझाद यांना आपल्या पक्षात येण्याचे निमंत्रण देत आहोत. आम्हाला अशी अपेक्षा आहे की, ते आमच्यासोबत येतील.बिहारप्रमाणेच काँग्रेस उत्तरप्रदेशात भाजपाच्या जवळपास ३० ते ३५ संसद सदस्यांच्या संपर्कात आहे. सूत्रांनी सांगितले की, यातील काही जणांसोबत चर्चा सुरु केली आहे. तर, काहींनी तिकीट वाटपापर्यंत चर्चेस नकार दिला. भाजपच्या संभाव्य बंडखोर संसद सदस्यांशी चर्चेसाठी काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते प्रयत्न करत आहेत. आम्ही त्यांना केवळ हे आश्वासन देत आहोत की, येथे त्यांना मान सन्मान दिला जाईल अणि त्यांचे मतही ऐकून घेतले जाईल. या नेत्याने सांगितले की, महाराष्ट्रातील नाना पटोले यांनी काँग्रेसची निवड केली आणि आपल्या संसद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. अशाप्रकारे पाऊल उचलण्याबाबत काही सदस्य व्दिधा मन:स्थितीत आहेत. मात्र, निवडणुकीपर्यंत ते सदस्य आपला मार्ग ठरवतील. आम्ही सातत्याने या लोकांच्या संपर्कात आहोत. हा प्रयत्न मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्येही सुरु आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी