शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
3
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
4
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
5
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
6
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
7
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
8
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
9
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
10
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
11
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
12
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
13
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
14
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
15
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
16
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
17
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
18
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
19
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
20
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं

दिल्लीत नव्या चेहऱ्यांना संधी; अमित शहांनी घेतली जोखीम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2020 5:26 AM

लोकसभेत १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी अनेक प्रचारसभा होण्याची शक्यता आहे.

- हरीश गुप्तानवी दिल्ली : लोकसभेत १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी अनेक प्रचारसभा होण्याची शक्यता आहे.सूत्रांनुसार मोदी फेब्रुवारीत लोकांचा मूड आणि प्रतिसाद पाहून ५ ते ६ सभांत बोलतील. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारविरोधात जोरदार हल्ला चढवून दोन दशकांपासून वंचित राहिलेली सत्ता मिळवण्यासाठी भाजपचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. दिल्लीत मुख्यमंत्रीपदासाठी कोणाला समोर आणण्याऐवजी भाजपच्या नेतृत्वाने मोदी यांचे वलय आणि लोकप्रियतेवर अवलंबून राहण्याचे ठरवले आहे.या पार्श्वभूमीवर भाजपच्या नेतृत्वाने मनोज तिवारी, विजय गोयल, मीनाक्षी लेखी, गौतम गंभीर आणि दोन विद्यमान खासदारांना मैदानात उतरवण्याची योजना बाजूला सारली. निवडणूक जर मोदी यांच्याच नावाने लढवली जाणार असेल, तर विद्यमान खासदारांना विधानसभा निवडणूक लढायला का सांगायचे, असे पक्ष नेतृत्वाला जाणवले.एवढेच पुरेसे नव्हते म्हणून की काय पक्षाने आम आदमी पक्ष आणि काँग्रेसशी दोन हात करण्यासाठी अनेक नव्या चेहऱ्यांना मैदानात उतरवले आहे. अगदीच नवीन आणि अपरिचित, अशा सुनील यादव यांना अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात उभे केले ते वरिष्ठांना हे सांगण्यासाठी की, स्थानिक निवडणुकांत तुमची आता गरज नाही.वस्तुस्थिती ही आहे की, विजय जॉली, आरती मेहरा, दिल्लीचे माजी मुख्य मेट्रोपोलिटन कौन्सिलर विजय कुमार मल्होत्रा यांचा मुलगा अजय मल्होत्रा, मदनलाल खुराणा यांचा मुलगा हरीश खुराणा आणि सुधांशू मित्तल यांना निवडणूक न लढवता प्रचार करण्यास सांगण्यात आले आहे.परिस्थिती अनुकूल असल्याचा दावामोठ्या आव्हानांना तोंड द्यावे लागत असल्याची जाणीव पक्षाला असली तरी नरेंद्र मोदी यांच्या सभा भाजपच्या बाजूने परिस्थिती निर्माण करतील, असे वाटते.परिस्थिती पक्षाला अनुकूल असल्याचा दावा वरिष्ठ पदाधिकाºयाने केला. तो म्हणाला की, शाहीन बागेत नागरिकत्व (दुरुस्ती) कायद्याविरोधात मुस्लिम महिलांनी केलेल्या आंदोलनामुळे भाजपचे कार्यकर्ते व सहानुभूतीदार सक्रिय झाले आहेत.दिल्लीत भाजप २० वर्षे सत्तेपासून वंचित आहे. धार्मिक आधारावर मतदारांची जी विभागणी झाली आहे तिची कसोटी लागेल, असे भाजपच्या नेतृत्वाचे मत आहे.च्प्रचार मोहिमेची आणि तिकीट वाटपाची सूत्रे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हाती होती. वस्तुस्थिती ही आहे की, अमित शहा यांनी गुरुवारी या विधानसभा निवडणुकीसाठी दुर्मिळ असा रोड शो घेतला आणि प्रचारासाठी तब्बल चार तासांपेक्षा जास्त वेळ दिला. 

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकBJPभाजपाAmit Shahअमित शहा