रामगड (राजस्थान) - राजस्थान विधानसभा निवडणुकीत 99 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या पण बहुमतापासून दूर राहिलेल्या काँग्रेसने अखेर आज बहुमताचा आकडा गाठला आहे. आज लागलेल्या रामगड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या निकालात काँग्रेसच्या शफिया जुबेर यांनी भाजपाच्या सुखवंत सिंह यांच्यावर 12 हजार 228 मतांनी विजय मिळवला. या विजयाबरोबरच 200 सदस्य असलेल्या राजस्थान विधानसभेत काँग्रेसचे शतकही पूर्ण झाले आहे.डिसेंबर महिन्यात झालेल्या राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी येथील बसपा उमेदवार लक्ष्मण सिंह यांचे निधन झाल्याने येथील निवडणूक निवडणूक आयोगाने रद्द केली होती. दरम्यान, राजस्थानमधील निकालांमध्ये पक्षाला एक जागा कमी मिळाल्याने रामगडची पोटनिवडणूक काँग्रेससाठी प्रतिष्ठेची झाली होती. त्यात काँग्रेस उमेदवार शाफिया जुबेर यांना 83 हजार 311 मते मिळवून विजयी झाल्या, तर भाजपा उमेदवार सुखवंत सिंह यांना 71 हजार 83 मते मिळाली.
राजस्थानमध्ये काँग्रेसचे शतक पूर्ण, रामगड विधानसभा पोटनिवडणुकीत दणदणीत विजय
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2019 13:56 IST
राजस्थान विधानसभा निवडणुकीत 99 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या पण बहुमतापासून दूर राहिलेल्या काँग्रेसने अखेर आज बहुमताचा आकडा गाठला आहे.
राजस्थानमध्ये काँग्रेसचे शतक पूर्ण, रामगड विधानसभा पोटनिवडणुकीत दणदणीत विजय
ठळक मुद्देराजस्थान विधानसभा निवडणुकीत 99 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या पण बहुमतापासून दूर राहिलेल्या काँग्रेसने अखेर आज बहुमताचा आकडा गाठलारामगड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या निकालात काँग्रेसच्या शफिया जुबेर यांनी भाजपाच्या सुखवंत सिंह यांच्यावर 12 हजार 228 मतांनी विजय मिळवलाया निकालामुळे राजस्थानमध्ये भाजपाच्या अडचणी वाढण्याची चिन्हे