शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेचे काँग्रेसकडून स्वागत संतोष पाटील: राजकारण न करता शेतकर्‍यांना जगवा

By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST

सोलापूर :

सोलापूर :
एनटीपीसीच्या पाईपलाईनमधून सोलापूरला पाणी देऊन बचत केलेले 20 टीएमसी पाणी ग्रामीण भागाला देण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या घोषणेचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष पाटील यांनी स्वागत केले आहे. दुष्काळ निवारणासाठी आम्ही सरकारसोबत असून, राजकारण न करता शेतकर्‍यांना जगवा, ही भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पावसाअभावी खरीप हंगाम वाया गेला. त्यामुळे जिल्हय़ातील शेतकरी अडचणीत आला. आहे ते पैसे खचरून, प्रसंगी सावकाराकडून कर्ज काढून हजारो फूट बोअरवर खर्च करून, आहे ती शेती जगविण्याचा प्रयत्न केला. पण जिल्हा प्रशासनाला हा दुष्काळ दिसलाच नाही. त्यामुळे दोन महिने आम्ही रस्त्यावर उतरलो. रस्ता रोको, मोर्चा यातून दुष्काळाची ही दाहकता सरकारपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला. दुष्काळ हे नैसर्गिक संकट आहे. त्यामुळे या परिस्थितीला तोंड देण्यासाठी राजकारण न करता आम्हीही सरकारबरोबर आहोत. शेतकर्‍यांचे कर्ज माफ व्हावे, विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करावी, वीज बिल माफ करावे, पिण्याचे पाणी व जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न सोडवावा, ही मागणी लावून धरली.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी रविवारी सोलापूर जिल्हा दौरा केल्यावर दुष्काळाची दाहकता त्यांना जाणवली. शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे सहानुभूतीपूर्वक पाहण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री सकारात्मक झाले, आता जिल्हा प्रशासनानेही लालफितीचा कारभार बाजूला ठेवून पीक पंचनामे द्यावेत व भेदरलेल्या शेतकर्‍यांना दिलासा द्यावा. विद्यार्थ्यांची फी माफ करण्याचा सरकारने निर्णय घेतला आहे, आता शेतकर्‍यांच्या प्रश्नांची सोडवणूक करावी, अशी मागणी पाटील यांनी केली.
इन्फो..
शिंदे यांची दूरदृष्टी
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी एनटीपीसीचा प्रकल्प सोलापुरात आणला. आता या प्रकल्पाची पाईपलाईन डिसेंबरपर्यंत पूर्ण करून सोलापूरकरांची तहान भागवू, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. हे शक्य झाले ते शिंदे यांच्या दूरदृष्टीमुळेच. कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आहे. आलम?ीचे पाणी आणण्याचा फडणवीस सरकारने प्रस्ताव दिला तर आम्ही प्रयत्न करू, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संतोष पाटील म्हणाले.