शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई इंडियन्सची लाजीरवाणी हार, शेवटच्या क्रमांकावर समाधान! रोहित शर्मा, नमन धीर यांचा संघर्ष व्यर्थ
2
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
3
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
4
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
5
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
6
मुलुंडमध्ये पैसे वाटपाच्या आरोपावरून तणाव; उद्धव सेना- भाजप कार्यकर्ते आमने-सामने
7
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
8
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
9
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
10
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
11
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
12
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
13
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
14
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
15
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
16
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

मोदींच्या आश्वासनांची पोलखोल करण्यासाठी काँग्रेसला सापडला 'स्मार्ट' मार्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2018 10:54 AM

तंत्रज्ञानाचा वापर करत काँग्रेसने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपची कोंडी करण्याची योजना आखली आहे.

मागील लोकसभा निवडणुकीत भाजपने हायटेक प्रचार करत बाजी मारली होती. स्मार्टफोन, सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत भाजपने काँग्रेसला धोबीपछाड दिला होता. आता याच तंत्रज्ञानाचा वापर करत काँग्रेसने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपची कोंडी करण्याची योजना आखली आहे. स्मार्टफोन आणि इंटरनेटच्या माध्यमातून मोदींनी दिलेली आश्वासने शोधा आणि मोदी किती यशस्वी झाले, हे तुम्हीच ठरवा, असे आवाहन काँग्रेसकडून लोकांना केले जाणार आहे.'२०१४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी मोदींनी जनतेला काय काय आश्वासने दिली होती, याबद्दल स्मार्टफोनवर सर्च करण्याचे आवाहन काँग्रेसकडून करण्यात येईल. मोदींची आश्वासन किती फसवी होती, हे यामधून लोकांना समजेल,' असे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने एका इंग्रजी संकेतस्थळाशी बोलताना सांगितले. २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीआधीच्या सभा आणि रॅलींमध्ये काँग्रेसकडून ही रणनिती वापरली जाईल. 'मोदींची आश्वासने गुगल करा आणि ती कितीपत खरी ठरली हे तपासून पाहा', असे आवाहन काँग्रेसकडून केले जाणार आहे. मागील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी मोदींना जनतेला 'अच्छे दिन' आणण्याचे आश्वासन दिले होते. मोदींच्या या आश्वासनांची काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अनेकदा खिल्ली उडवली आहे. आता यापुढे जाऊन पुढील निवडणुकीच्या प्रचारावेळी राहुल गांधी लोकांना मोदींच्या आश्वासनांचे काय झाले हे गुगल करुन पाहा, असे आवाहन करणार आहेत. मोदींनी रोजगार, अर्थव्यवस्था, शेती, पायाभूत सोयीसुविधा, धार्मिक सलोखा, भ्रष्टाचार, काळा पैसा आणि प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाख अशी अनेक आश्वासने दिली होती. मोदी सरकारने ही सर्व आश्वासने पूर्ण केली आहेत का?, हे गुगल करुन शोधण्याचे आवाहन काँग्रेसकडून केले जाणार आहे. या आवाहनाला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, अशी आशा काँग्रेस नेत्यांना आहे. यामुळे मोदींच्या आश्वासनांची नेमकी स्थिती काय आहे, हे लोकांना समजेल, असे काँग्रेस नेत्यांना वाटते.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधी