शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

उत्तर प्रदेशात काँग्रेसचे दमदार उमेदवार; सपा-बसपाचे टेन्शन वाढवणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 9:32 AM

काँग्रेसने काही मतदारसंघांमध्ये काँग्रेसने दमदार उमेदवार दिल्याने या ठिकाणी चुरशीची लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लखनौ - सपा-बसपाने केलेल्या महाआघाडीत स्थान न मिळाल्याने काँग्रेसनेउत्तर प्रदेशात स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. प्रियंका गांधी यांना पक्षात महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आल्यानंतर काँग्रेसनेउत्तर प्रदेशात जोरदार प्रचार मोहीमही हाती घेतली आहे. दरम्यान, राज्यातील काही मतदारसंघांमध्ये काँग्रेसने दमदार उमेदवार दिल्याने या ठिकाणी चुरशीची लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच काँग्रेसच्या उमेदवारांमुळे सपा-आणि बसपाचे टेन्शन वाढले असून, महाआघाडी आणि कांग्रेसमध्ये होणाऱ्या मतविभागणीमुळे काही मतदारसंघात सहज विजय मिळेल, अशी आशा भाजपाच्या मनात निर्माण झाली आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशाता काँग्रेसची दाणादाण उडाली होती. मात्र त्याही परिस्थितीत गाझियाबाद, सहारनपूर, लखनौ, कानपूर, बाराबंकी आणि कुशीनगर येथे काँग्रेसला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. त्यामुळे या ठिकाणी तिरंगी लढती रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यातच काही ठिकाणी बीएसपीचे उमेदवार कमकुवत भासत आहेत, अशा परिस्थितीत महाआघाडीला मत द्यायचे की काँग्रेसला असा भ्रम  मतदारांच्या मनात निर्माण होऊ शकतो. तसेच काही शहरी मतदारसंघांमध्ये भाजपाविरोधात काँग्रेसच मुख्य प्रतिस्पर्धी आहे. अशा ठिकाणी सपा बसपाकडे दमदार नेते नाहीत, तिथेही काँग्रेसविरुद्ध भाजपा अशीच लढत रंगू शकते.   मतदारसंघांचा विचार केल्यास काँग्रेसने सहारनपूर येथून इम्रान मसूद यांना तिकीट दिले आहे. भाजपाविरोधात घणाघाती वक्तव्ये करणाऱ्या मसूद यांची मुस्लिम मतदारांवर चांगली पकड आहे. त्यामुळे ते सपा-बसपाच्या व्होट बँकेला सुरुंग लावू शकतात. अशा परिस्थितीत भाजपा उमेदवार राघव लखनपाल यांना मतविभागणीचा फायदा मिळू शकतो. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राज बब्बर यांना आता मुरादाबादऐवजी फतेहपूर सिक्री येथून उमेदवारी देण्यात आली आहे. येथे एकदा त्यांचा निसटत्या फरकाने पराभव झाला होता. मात्र यावेळी त्यांचा दावा मजबूत दिसत आहेत. इथेही तिरंगी लढत रंगण्याची शक्यता आहे. तसेच इथेही काँग्रेस आणि सपा-बसपा आघाडीत मतविभागणी होण्याचा धोका आहे.  माजी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद यांना फार्रुखाबाद मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आले आहे.  तिथेही मुस्लिम मतदारांमध्ये मोठ्या प्रमाणात मतविभागणी होण्याची शक्यता आहे. तर अलीगड येथे बसपाने दिलेले उमेदवार अजित बालयान हे बाहेरचे आहेत, मात्र ते मोठ्या प्रमाणावर मतविभागणी घडवून आणू शकतात. काँग्रेसने इथे बृजेंदर सिंह यांना ऊमेदवारी दिली आहे. त्यांना मुस्लिम मतदारांचा चांगला पाठिंबा आहे.  गाझियाबाद येथे काँग्रेसला बऱ्यापैकी समर्थन प्राप्त आहे. मात्र 2014 साली भाजपा उमेदवार जनरल व्ही. के. सिंह यांनी काँग्रेस उमेदवार राज बब्बर यांचा दारुण पराभव केला होता. यावेळी  काँग्रेसने गाझियाबाद येथून डॉली शर्मा यांना उमेदवारी दिली आहे.  समाजवादी पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बाराबंकी येथे 2009 मध्ये पी. एल. पुनिया यांनी विजय मिळवला होता. तर 2014 मध्ये भाजपाच्या प्रियंका रावत यांनी पुनिया यांचा पराभव केला होता. यावेळी पुनिया यांचे पुत्र तनुज यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. पण सपा-बसपा आघाडीला मतांचे गणित आपल्या बाजूने फिरण्याची आशा आहे.  तर कानपूरमध्ये माजी केंद्रीय मंत्री श्रीप्रकाश जयस्वाल यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. येथेही तिरंगी लढतीचा लाभ भाजपाला होऊ शकतो. तर कुशीनगरमध्ये काँग्रेसचे नेते आरपीएन सिंह यांचा भाजपासोबत थेट मुकाबला आहे. मात्र येथेही तिरंगी लढतीमुळे भाजपा फायदा होऊ शकतो.   

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकcongressकाँग्रेसSamajwadi Partyसमाजवादी पार्टीBahujan Samaj Partyबहुजन समाज पार्टीBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश