शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

महाभियोग नाकारल्यास काँग्रेस जाणार कोर्टात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2018 01:24 IST

सभापतींकडे लक्ष : वाजवी वेळेत निर्णय घेणे अपेक्षित

नवी दिल्ली : सरन्यायाधीश न्या. दिपक मिस्रा यांच्याविरुद्ध महाभियोग चालविण्यासाठी दिलेल्या नोटिशीवर राज्यसभेच्या सभापतींनी वाजवी वेळेत निर्णय घेईपर्यंत प्रतिक्षा करायची व त्यांनी निर्णय घेण्यास अवाजवी विलंब केला किंवा नोटीस फेटाळली तर त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात त्याविरुद्ध दाद मागायची अशी रणनीती काँग्रेसने आखल्याचे कळते. महाभियोगाचा विषय नेटाने लावून धरायचा आणि तो सतत चर्चेत ठेवायचा, अशी यामागची भूमिका आहे.काँग्रेससह आठ विरोधी पक्षांच्या नेत्यांनी शुक्रवारी राज्यसभेचे सभापती व उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांना भेटून ६४ राज्यसभा सदस्यांच्या स्वाक्षरीची महाभियोगाची नोटीस त्यांना दिली होती. एक ज्येष्ठ काँग्रेस नेता म्हणाला की, सभापती हा निर्णय वाजवी वेळेत घेतील, अशी अपेक्षा आहे. वाजवी म्हणजे नेमका किती वेळ याचा काही ठरलेला निकष नसला तरी सभापती हा निर्णय अमर्याद काळ टाळू शकत नाहीत, हे नक्की. त्यामुळे त्यांनी वाजवी वेळेत निर्णय घेण्याची आम्ही वाट पाहू.सोमवारी प्रक्रिया सुरू होण्याची शक्यताराज्यसभा सचिवालयाने महाभियोग नोटिशीची प्राथमिक शहानिशा करून सभापतींच्या निर्णयासाठी फाईल तयार करण्याचे काम सुरु केले आहे. राज्यसभा सदस्यांकडून अपेक्षित वर्तनासंबंधीच्या नियमांचे जे हॅण्डबूक तयार केले आहे त्यात कोणाही सदस्याने सभापतींना दिलेल्या नोटिशीवर निर्णय होईपर्यंत त्यास प्रसिद्धी देऊ नये, असे म्हटले आहे. नोटीस देणाऱ्या विरोधी पक्षनेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन या नियमाचा भंग केला का, असा मुद्दा काही अधिकाºयांनी उपस्थित केला आहे. मात्र याचा निर्णय सभापतींनीच घ्यायचा आहे. नायडू हैदराबादहून रविवारी राजधानीत आले व त्यांनी काही तज्ज्ञांशी या विषयावर प्राथमिक सल्लामसलत केली.नैतिक दबावाची पक्षाची व्यूहरचना सरन्यायाधीशांवर नैतिकदबाब, आणण्याचीही काँग्रेसची व्यूहरचना आहे. याचाच एक भाग म्हणून पूर्वीच्या महाभियोग प्रकरणांचा दाखला देऊन काँग्रेसचे असे म्हणणे आहे की, सभापती किंवा अध्यक्षांनी नोटीस स्वीकारून महाभियोगाची कारवाई सुरु केल्यावर संबंधित न्यायाधीशाने न्यायालयीन ाणि प्रशासकीय कामापासून दूर राहावे, असे संकेत आहेत. सरन्यायाधीश न्या. मिस्रा यांनीही त्यांचे पालन करणे अपेक्षित आहे.

 

सरन्यायाधीश अविचलित; नेहमीप्रमाणे सुरू ठेवणार काम

महाभियोगाची नोटीस व त्यावरून होणारी उलट-सुलट चर्चा याने अजिबात विचलित न होता सरन्यायाधीश न्या. मिस्रा आपले काम नेहमीप्रमाणे सुरु ठेवणार असल्याचे न्यायालयाने२३ एप्रिलपासूनच्या आठवड्यासाठी प्रसिद्ध केलेल्या कामकाजाच्या सूचीवरून दिसते. विविध खंडपीठांपुढील कामांची ही सूची न्यायालयाच्या रजिस्ट्रीने तयार केली असली तरी प्रकरणांचे विषयानुरूप वाटप ‘मास्टर आॅफ रोस्टर’ या नात्याने सरन्यायाधीशांनी केलेले आहे. त्यानुसार तीन किंवा पाच न्यायाधीशांचे खंडपीठ म्हणून येत्या आठवड्यात जे महत्त्वाचे विषय सरन्यायाधीशांपुढे सुनावणीसाठी लावले गेले आहेत त्यात ‘आधार’ची वैधता, कथुआ येथील बलात्काराचा खटला काश्मिरबाहेर वर्ग करण्याचा विषय, अयोध्येतील बाबरी मशिद-राम जन्मभूमी वादासंबंधीची अपिले, केरळमधील शबरीमल मंदिरातील ठराविक वयाच्या महिलांना लागू असलेली प्रवेशबंदी आणि समलिंगी लैंगिक संबंधांना मान्यता देणे यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

 

टॅग्स :congressकाँग्रेस