नरेंद्र मोदी अंबानी, अदानींना भाऊ मानतात, राहुल गांधींची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 22:53 IST2018-10-15T22:53:02+5:302018-10-15T22:53:41+5:30

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्याच्या दौऱ्यावर असलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर घणाघाती टीका केली.

Congress President Rahul Gandhi offers prayers at Peetambra Shaktipeeth | नरेंद्र मोदी अंबानी, अदानींना भाऊ मानतात, राहुल गांधींची घणाघाती टीका

नरेंद्र मोदी अंबानी, अदानींना भाऊ मानतात, राहुल गांधींची घणाघाती टीका

भोपाळ - मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्याच्या दौऱ्यावर असलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्यावर घणाघाती टीका केली. नरेंद्र मोदी हे तुम्हाल मित्र म्हणून संबोधतात. मात्र अनिल अंबानी, नीरव मोदी यांना भाऊ मानतात, असे राहुल गांधी म्हणाले. 

मध्य प्रदेश दौऱ्यावर आलेल्या राहुल गांधी यांनी आज दातिया येथील पीतांबरा मंदिरात पूजा केली. त्यानंतर एका सभेला संबोधित करताना मोदी आणि शिवराज सिंह यांच्यावर निशाणा साधला. नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांची साथ सोडून केवळ मोठ्या उद्योगपतींनाच मदत केली आहे. मोदी तुम्हाला मित्र म्हणतात, मात्र नीरवा मोदी आणि अनिल अंबानी यांना भाऊ मानतात, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.

मोदींनी राफेल विमानांचे काम एचएएलकडून काढून आपले मित्र असलेल्या अनिल अंबानींना दिले. देशाच्या चौकीदाराने 30 हजार कोटींची चोरी केली आणि आपल्या मित्राला 30 हजार कोटींचा फायदा करवून दिला. मध्य प्रदेशात आमचे सरकार आल्यास 10 दिवसांत शेतकऱ्यांचे कर्जमाफ केलं जाईल, असे आश्वासनही राहुल गांधी यांनी दिले.  



 

Web Title: Congress President Rahul Gandhi offers prayers at Peetambra Shaktipeeth