काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, प्रकृती बिघडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2025 09:26 IST2025-10-01T09:26:12+5:302025-10-01T09:26:47+5:30
बेंगळुरू: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना बेंगळुरू येथील रुग्णालयात दाखल करण्यात ...

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, प्रकृती बिघडली
बेंगळुरू:काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना बेंगळुरू येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या वृत्तामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आणि राजकीय वर्तुळात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खरगे यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, मात्र त्यांना नेमका काय त्रास होत आहे, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. खरगे यांच्या कुटुंबीयांकडून किंवा काँग्रेस पक्षाकडूनही यावर सविस्तर निवेदन प्रसिद्ध करण्यात आलेले नाही.
८३ वर्षीय मल्लिकार्जुन खरगे हे राजकारणातील एक अनुभवी नेते आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते पक्षाच्या कामात आणि आगामी निवडणुकांच्या तयारीत व्यस्त होते. त्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष आगामी विधानसभा निवडणुकांच्या तयारीला लागला आहे. सध्या डॉक्टरांची एक टीम त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे आणि आवश्यक ते सर्व उपचार करत आहेत.