Congress MP Praniti Shinde News: देशातील ९ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदारांच्या तपासणीची प्रक्रिया सुरू आहे. निवडणूक आयोगाकडून सुरू असलेल्या या मतदार यादी दुरुस्ती (SIR) प्रक्रियेचा देशभरातून विरोध होताना पाहायला मिळत आहे. सोमवारी संसदेपासून ते रस्त्यापर्यंत तीव्र विरोध दिसून आला. संसदेत विरोधकांनी एसआयआरवरून जोरदार गदारोळ केल्याचे पाहायला मिळाले. यातच मोदी सरकार यासंदर्भात काय लपवायचा प्रयत्न करत आहे, असा सवाल काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी केला.
कोणते मुद्दे उपस्थित करायचे हे आम्ही ठरवू. आम्ही त्यांना चर्चा करण्यासाठी वेळ सांगू. निवडणूक भूमिकेची प्रामाणिकता महत्त्वाची आहे असे आम्हाला वाटते. आम्ही कोणते मुद्दे उपस्थित करावेत हे सरकार ठरवू शकत नाही. प्रत्येक राज्यात निवडणुका कधी होणार आहेत याची संपूर्ण माहिती निवडणूक आयोगाकडे आहे. निवडणूक आयोग ही प्रक्रिया १२ ते १८ महिने आधीच पूर्ण करू शकले असते. घाई का करायची? बीएलओंवर इतका दबाव का आणायचा की त्यामुळे मृत्यूही होऊ शकतात?, या शब्दांत SIR वरून काँग्रेस खासदार कार्ति चिदंबरम यांनी टीका केली. कार्ति चिदंबरम यांच्यासह खासदार प्रणिती शिंदे यांनीही यावरून सरकारवर निशाणा साधला.
मोदी सरकार काय लपवायचा प्रयत्न करत आहे?
मीडियाशी बोलताना प्रणिती शिंदे म्हणाल्या की, आम्ही सभागृह तहकूब करायचे नाही; ते आम्हाला अधिवेशन तहकूब करण्यास भाग पाडत आहेत. आम्ही एसआयआरवर चर्चा करण्याची मागणी करत आहोत. अनेक राज्यात याबाबत समस्या येत आहेत. परंतु, चर्चा करण्यास सरकार का तयार नाही, हे मला माहिती नाही. मोदी सरकार काय लपवण्याचा प्रयत्न करत आहे? अशी विचारणा प्रणिती शिंदे यांनी केली आहे.
दरम्यान, पश्चिम बंगालची राजधानी कोलकात्यात बुथ लेव्हल ऑफिसर्स (BLO) रस्त्यावर उतरून मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले. कोलकात्यात शेकडो BLO नी निवडणूक आयोगाच्या कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन केले. त्यांनी कार्यालयाचा घेराव केला आणि परिसरात घुसण्याचाही प्रयत्न केला. SIR प्रक्रियेविरोधात पश्चिम बंगालमध्ये वातावरण तापले असून, BLO चे हे आंदोलन अधिक तीव्र स्वरूपात पाहायला मिळाले.
Web Summary : Congress MP Praniti Shinde questions the Modi government's motives regarding the voter list revision (SIR) process. Opposition protests nationwide, alleging hidden agendas. BLO protests in Kolkata intensify.
Web Summary : कांग्रेस सांसद प्रणिती शिंदे ने मतदाता सूची संशोधन (SIR) प्रक्रिया पर मोदी सरकार की मंशा पर सवाल उठाया। राष्ट्रव्यापी विरोध प्रदर्शनों में छिपे हुए एजेंडे का आरोप लगाया गया। कोलकाता में बीएलओ का विरोध तेज।