सरकारी निवासस्थानात चूल पेटवू द्या, काँग्रेस आमदाराची अजब मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2021 19:24 IST2021-09-08T19:21:02+5:302021-09-08T19:24:18+5:30
Uttar Pradesh MLC: एलपीजी गॅसच्या वाढत्या किमतींचा हवाला देत काँग्रेस आमदाराने सरकारकडे चूल पेटवू देण्याची मागणी केली आहे.

सरकारी निवासस्थानात चूल पेटवू द्या, काँग्रेस आमदाराची अजब मागणी
लखनऊ:उत्तर प्रदेशमधीलकाँग्रेसचे आमदार दीपक सिंह यांनी राज्य सरकारकडे एक विचित्र मागणी केली आहे. विधान परिषदेचे आमदार असलेल्या दीपक सिंह यांनी एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ झाल्यामुळे अधिकृत निवासस्थानी चूल पेटवून स्वयंपाक करण्याची मागणी केली आहे.
https://t.co/CPHTMOi5rI
— Lokmat (@MiLOKMAT) September 8, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.#ModiCabinet
विभागाच्या प्रभारींना लिहिलेल्या पत्रात दीपक सिंह म्हणतात की, 2024 पूर्वी एलपीजीच्या वाढीव किंमतीपासून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. आणि एलपीजी सिलेंडरच्या किंमतीच्या तुलनेत लाकूड आणि कोळसा स्वस्त आहे. त्यामुळे मला दिलेल्या सरकारी निवासस्थानात चूल पेटवून स्पयंपाक करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
https://t.co/zEAtU6HVyt
— Lokmat (@MiLOKMAT) September 8, 2021
नारायण राणेंनी काल पत्रकार परिषद घेत उद्घाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची गरज नसल्याचं म्हटलं होतं.#NarayanRane#DevendraFadnavis#UddhavThackeray
दीपक सिंह पुढे म्हणाले की, महिन्यात दोन वेळा 975 रुपयांचे सिलेंडर घ्यावे लागते. याउलट फक्त 500 रुपये महिना खर्च करुन चुलीवर स्वयंपाक होतो. माझ्यासह इतर काही आमदारांनाही आपल्या निवासस्थानी चुल पेटवायची आहे, त्यांनाही परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.