काँग्रेस आमदारावर पत्नीनंच दाखल केला बलात्काराचा गुन्हा, FIR मध्ये म्हटलं…’हे व्हिडिओ बनवातात!’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2022 15:24 IST2022-11-21T15:23:56+5:302022-11-21T15:24:13+5:30

मध्यप्रदेशमधील काँग्रेसचे आमदार उमंग सिंघार यांच्याविरोधात त्यांच्याच पत्नीने अत्याचाराची तक्रार दाखल केली आहे. 

congress mla umang singhar booked for raping and mentally harassing wife | काँग्रेस आमदारावर पत्नीनंच दाखल केला बलात्काराचा गुन्हा, FIR मध्ये म्हटलं…’हे व्हिडिओ बनवातात!’

काँग्रेस आमदारावर पत्नीनंच दाखल केला बलात्काराचा गुन्हा, FIR मध्ये म्हटलं…’हे व्हिडिओ बनवातात!’

मध्यप्रदेशमधील काँग्रेसचे आमदार उमंग सिंघार यांच्याविरोधात त्यांच्याच पत्नीने अत्याचाराची तक्रार दाखल केली आहे. उमंग सिंघार हे मध्य प्रदेशातील काँग्रेसचे आदिवासी चेहरा मानले जातात. त्यांच्या विरोधात पत्नीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.  20 नोव्हेंबर रोजी आमदार उमंग सिंघार यांच्याविरोधात घरगुती हिंसाचार, बलात्कार आणि अनैसर्गिक लैंगिक संबंधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीत पत्नीने आमदार पतीवर शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिला सुमारे 4 महिन्यांपासून सतत त्रास दिला जात आहे, पण, तिचे आई-वडील आणि सामाजिक प्रतिष्ठा पाहता ती कोणालाच सांगत नव्हती. असं पत्नीने एफआयआरमध्ये लिहिले आहे. 

पत्नीने एफआयआर मध्ये म्हटले आहे की, "सिंगरने मला लग्नाचे वचन दिले होते, त्यामुळे मी त्याच्यासोबत राहू लागले. पण जेव्हा मी त्यांना लग्नासाठी विचारले तेव्हा तो टाळू लागला. त्यावेळी मी तक्रार करण्याबाबत बोलले तेव्हा त्याने 16 एप्रिल 2022 रोजी भोपाळ मध्ये  माझ्यासोबत लग्न केले. पण लग्नानंतर तो मला मारहाण करून माझ्यावर अत्याचार  करायचा. मी नकार दिल्यास जीवे मारण्याची धमकी द्यायचा. अश्लील व्हिडिओ बनवून मला ब्लॅकमेल करायचा. माझ्यासोबत अनैसर्गिक शारीरिक संबंध ठेवायचा, असंही या एफआयएरमध्ये म्हटले आहे. 

हे गंभीर आरोप आणि तक्रार दाखल झाल्यानंतर उमंग सिंघार यांनी एका निवेदनाद्वारे आपली बदनामी करण्याचे हे षडयंत्र रचले जात असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाला की, पत्नी त्यांच्याकडे '10 कोटी रुपयांची' मागणी करत होती आणि तसे न केल्यास राजकीय कारकीर्द संपवण्याची 'धमकी' देत होती. आपलाही मानसिक छळ करून ब्लॅकमेल केले जात असल्याचे सिंगर यांनी म्हटले आहे. याविरोधात त्यांनी 2 नोव्हेंबर रोजी नौगाव पोलिस ठाण्यात अर्जही दिला होता. यावर भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी टीका केली.

Web Title: congress mla umang singhar booked for raping and mentally harassing wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.