"सचिन पायलट यांच्याशी बोलणं झालंय, ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील"

By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2021 09:05 AM2021-06-10T09:05:21+5:302021-06-10T09:05:53+5:30

उत्तर प्रदेशात जितिन प्रसाद यांच्या रुपात काँग्रेसला धक्का; आता सचिन पायलट यांच्या भाजप प्रवेशाची जोरदार चर्चा

congress leader sachin pilot will join bjp soon claims rita bahuguna joshi | "सचिन पायलट यांच्याशी बोलणं झालंय, ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील"

"सचिन पायलट यांच्याशी बोलणं झालंय, ते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील"

Next

नवी दिल्ली: उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक तोंडावर आली असताना भारतीय जनता पक्षानं काँग्रेसला जोरदार धक्का दिला. जितिन प्रसाद यांनी काँग्रेसचा हात सोडून भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जाणारे प्रसाद यांनी पक्षाला रामराम केल्यानं उत्तर प्रदेशात आधीच अडचणीत असलेल्या काँग्रेसच्या समस्यांमध्ये भर पडली आहे. त्यातच आता राजस्थानातील काँग्रेसचे महत्त्वाचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलटदेखील पक्षाला रामराम करण्याची शक्यता आहे. २५ वर्षे काँग्रेसमध्ये राहिलेल्या आणि नंतर भाजपवासी झालेल्या रिटा बहुगुणा जोशींनी तसा दावा केला आहे.

राजस्थानात पुन्हा राजकीय भूकंप; सचिन पायलट समर्थकांनी आखला प्लॅन, जुलैपर्यंत हायकमांडला मुदत

सचिन पायलट लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, असा दावा रिटा बहुगुणा जोशी यांनी 'आज तक' या हिंदी वृत्तवाहिनीवरील चर्चेदरम्यान केला. 'पायलट लवकरच भाजपमध्ये येतील. माझं त्यांच्याशी फोनवरून बोलणं झालं आहे,' असं रिटा म्हणाल्या. काँग्रेस पक्ष आता उत्तर भारतात संपल्यात जमा असल्याचं त्या पुढे म्हणाल्या. सचिन पायलट काँग्रेसमध्ये नाराज असल्याचं समजतं. काही महिन्यांपूर्वी त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली. त्यावेळी त्यांची समजूत काढण्यात आली. मात्र तेव्हा पायलट यांना देण्यात आलेली आश्वासनं अद्यापही पूर्ण झालेली नाहीत.

राजस्थान काँग्रेसमध्ये पुन्हा बंडाळीची चाहूल, पायलट गटाच्या ज्येष्ठ आमदाराने दिला राजीनामा

राहुल गांधींचे निकटवर्तीय आणि माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांनी काल दुपारी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपच्या दिल्लीतील मुख्यालयात पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला. केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं पक्षात स्वागत केलं. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर जितिन प्रसाद भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या भारताची निर्मिती करत आहेत. या कार्यात योगदान देण्यासाठी मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, असं प्रसाद यांनी पक्षप्रवेशानंतर सांगितलं.

Read in English

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: congress leader sachin pilot will join bjp soon claims rita bahuguna joshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app