मुंबई: कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि तो रोखण्यासाठी करण्यात आलेला लॉकडाऊन याबद्दल काँग्रेस खासदार राहुल गांधी सातत्यानं केंद्र सरकारला लक्ष्य करत आहे. कोरोना संकटाची हाताळणी आणि लॉकडाऊनचा गरिबांना बसलेला फटका या मुद्द्यांवर राहुल गांधी व्हिडीओच्या माध्यमातून भाष्य करत आहेत. या व्हिडीओतील राहुल गांधी यांच्या लूकची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.राहुल गांधी व्हिडीओच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधताना वेगवेगळ्या लूकमध्ये दिसतात. शुक्रवारी त्यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला. त्यामधील राहुल यांचा लूक पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. व्हिडीओत राहुल यांचे केस काहीसे कुरळे दिसत होते. त्यांनी हाफ टीशर्ट परिधान केला होता.
बापरे! आठवड्याभरात इतका बदलला राहुल गांधींचा लूक; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 18:50 IST