शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
3
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
4
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
5
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
6
'आरक्षणाची मर्यादा वाढवणार की नाही?', काँग्रेसचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट सवाल
7
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
8
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
9
"प्रभू श्रीराम हृदयात आहेत, पण राम मंदिर..."; मेनका गांधी यांचे निवडणूक प्रचारादरम्यान विधान
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

काँग्रेस तयार करणार सोशल मीडिया वॉरियर्स टीम, व्हिडिओ जारी करत राहुल गांधींनी केलं असं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2021 7:28 PM

रोहन गुप्ता म्हणाले, लोकशाही संस्थांना दाबले जात आहे. तसेच सरकारविरोधी आवाज उचलणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, याला उत्तर देणे आणि देश वाचविणे ही काँग्रेसची जबाबदारी आहे. (Rahul Gandhi)

नवी दिल्ली -काँग्रेसनेसोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर चांगली पकड मिळविण्यासाठी कवायत सुरू केली आहे. यासाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लोकांना सोशल मिडिया वॉरियर्स टीम जॉइन करण्याचे आवाहन केले आहे. यासाठी त्यांनी टोल फ्री नंबरदेखील जारी केला आहे. व्हॉट्सअॅप, वेबसाईट आणि ईमेलच्या सहाय्यानेही या टीमचा भाग होता येऊ शकते.  (Congress Leader Rahul Gandhi message join the social media warrior team)

सोशल मिडिया वॉरियर्स टीमसंदर्भात राहुल गांधी म्हणाले, ही टीम न्यायासाठी लढणाऱ्या योद्ध्यांची आहे. ही द्वेश भावना ठेवणारी सेना नाही. ही हिंसाचार करणारी सेना नाही. ही सत्याची सेना आहे (army of truth). ही सेना भारताच्या विचारांचे रक्षण करेल. 

पक्षाचे वरिष्ठ नेते पवन कुमार बंसल, प्रवक्ते पवन खेडा आणि पक्षाचे सोशल मिडिया प्रमुख रोहन गुप्ता यांनी सोमवारी या अभियानाला सुरुवात केली. बंसल म्हणाले, प्रत्येक शहरातून 5 लाख सोशल मीडिया वॉरियर्स तयार करण्याचे या अभियानाचे लक्ष्य आहे. यांच्या माध्यमाने देशासमोरील मुद्दे उचलले जातील. तसेच या योद्ध्यांच्या माध्यमाने विचार आणि सिद्धांतांवर चर्चा होईल.

रोहन गुप्ता म्हणाले, लोकशाही संस्थांना दाबले जात आहे. तसेच सरकारविरोधी आवाज उचलणाऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, याला उत्तर देणे आणि देश वाचविणे ही काँग्रेसची जबाबदारी आहे.

तसेच, ते म्हणाले, की आम्ही शांत बसू शकत नाही. देशाचा आवाज उचलणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. यामुळेच आम्ही या अभियानाला सुरुवात करत आहोत. हे अभियान आम्ही एक महिना चालवणार आहोत. जेनेकरून लोक या अभियानाशी जोडले जातील.

टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाSocial Mediaसोशल मीडिया