शहरं
Join us  
Trending Stories
1
बेंजामिन नेतन्याहू म्हणजे 'गाझाचे कसाई'; तुर्कस्थानच्या राष्ट्राध्यक्षांची इस्रायलच्या पंतप्रधानांवर बोचरी टीका
2
मणिपूरमध्ये CRPF च्या ताफ्यावर कुकी उग्रवाद्यांकडून भीषण हल्ला, दोन जवानांना वीरमरण   
3
ठाण्यामध्ये साक्षात नरेंद्र मोदी जरी उभे राहिले तरी विजय आमचाच होणार, ठाकरे गटाने महायुतीला डिवचले
4
Investment Tips : महिलांसाठी कमालीची आहे 'ही' सरकारी स्कीम, मिळतंय जबरदस्त व्याज; जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
5
महामुंबईत पहिल्याच दिवशी ३८९ अर्जांची विक्री; सोमवारनंतर बहुतांश उमेदवार अर्ज भरणार
6
'जुनं फर्निचर' मध्ये दिसला असता सलमान खान? महेश मांजरेकरांनी केला खुलासा
7
उत्तराखंडमधील जंगलांमध्ये भीषण वणवा, नैनीतालच्या हायकोर्ट कॉलनीपर्यंत पोहोचली आग, लष्कराला पाचारण
8
बेपत्ता होण्यापूर्वी 'तारक मेहता' फेम गुरुचरणने केला होता शेवटचा मेसेज, अभिनेत्याने दिली माहिती, म्हणाला...
9
GoFirstला मोठा झटका, दिल्ली हायकोर्टानं सर्व ५४ विमानांचं रजिस्ट्रेशन रद्द करण्यास मंजुरी
10
उमेदवारासाठी ठाण्यातील महायुतीचे कार्यकर्ते काकुळतीला; उमेदवारी मिळणार कुणाला?
11
Patanjali Foods 'हा' व्यवसाय खरेदी करण्याच्या तयारीत, काय आहे बाबा रामदेव यांच्या कंपनीचा प्लान?
12
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२४, व्यापारात दिवस लाभदायी ठरेल, सहल - प्रवास होतील
13
‘जय भवानी’बाबत उद्धवसेनेचा फेरविचार अर्ज फेटाळला; आता पुढे काय?
14
'तारक मेहता' फेम मिस्टर सोढीने बेपत्ता होण्याच्या आधी केली होती पोस्ट, २ दिवसांपासून फोनही आहे बंद
15
शिक्षण अकरावी, संपत्ती कोट्यवधी अन् डोक्यावर कर्ज; पाच वर्षात मिहिर कोटेचा बनले करोडपती
16
उत्तर पूर्व मुंबईत ९३ लाखांची रोकड जप्त; कमळाचे चिन्ह असलेल्या कपबशीही ताब्यात 
17
राजेंद्र गावितांचा पत्ता कट? बविआ महायुतीत येणार; ‘लग्न आपल्या घरचे आहे’ अशी साद...
18
उद्धव ठाकरेंचे मत ‘हाता’ला, तर राज यांचे ‘धनुष्यबाणा’ला; लोकसभेला विचित्र योग
19
युद्धभूमीत मृत आईच्या पोटातून जिवंत बाळ! अख्खं कुटुंब हल्ल्यात ठार झालं

"महात्मा गांधींच्या आजूबाजूला महिला दिसायच्या, मोहन भागवत यांच्यासोबत का नाही?"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2021 7:56 PM

"त्यांची (मोहन भागवत) संघटना आरएसएस महिला शक्तीला दाबण्याचे काम करत. तर, काँग्रेस संघटना महिलांना पुढे जाण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देते."

नवी दिल्ली - काँग्रेसचे माजी अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी यांनी बुधवारी भारतीय जनता पक्ष (भाजप) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. भाजप आणि संघ महिलांना पुढे येऊ देत नाही, असा घणाघाती आरोप त्यांनी केला. याच वेळी त्यांनी, महात्मा गांधी यांच्या फोटोमध्ये साधारणपणे 2-3 महिला दिसतात. पण, मोहन भागवत यांच्या फोटोत महिला का दिसत नाहीत? असा सवालही राहुल गांधी यांनी केला आहे. (Congress leader Rahul Gandhi ask Mahatma Gandhi seen with women around him why Mohan Bhagwat not)

राहुल गांधी म्हणाले, त्यांची (मोहन भागवत) संघटना आरएसएस महिला शक्तीला दाबण्याचे काम करत. तर, काँग्रेस संघटना महिलांना पुढे जाण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देते. राहुल गांधी म्हणाले, आरएसएसने आजपर्यंत कोणत्याही महिलेला पंतप्रधान केले नाही. मात्र, काँग्रेसने एका महिलेला देशाचे पंतप्रधान बनवले होते. भाजप सरकारने लक्ष्मी आणि शक्तीला घरातून बाहेर काढले आहे. सरकारने असे धोरण लागू केले आहे, की आज लोकांकडे पैसे नाहीत. नोटाबंदी, जीएसटी आणि कृषी कायदे, यांसारखी समाजविरोधी धोरणे राबवून, या सरकारने लक्ष्मीची संपूर्ण शक्ती आपल्या चार-पाच लोकांच्या हाती सोपविली आहे.

हातात बॅग घेऊन पंतप्रधान 'मोदी' ट्रेननं कुठे निघाले...? आपणही फसलात ना...?

महिला काँग्रेसच्या स्थापना दिन कार्यक्रमात राहुल गांधी म्हणाले, "जेव्हा आपण महात्मा गांधींचा फोटो पहता, तेव्हा आपल्याला त्यांच्या आजूबाजूला 2-3 महिला दिसतील. याउलट, आपण कधी मोहन भागवत यांचा एखाद्या महिलेसोबत फोटो पाहिला आहे? कारण त्यांची संघटना महिलांना दडपण्याचे काम करत आणि आमचा पक्ष त्यांना व्यासपीठ देते," असे राहुल गांधी म्हणाले.

देशावरील दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती यांचा आशीर्वाद कमी झाला आहे -तत्पूर्वी, माता वैष्णो देवीचे दर्शन घेतल्यानंतर, राहुल गांधी यांनी जम्मूच्या त्रिकुटा नगर येथे कार्यकर्त्यांना आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका केली होती. तेव्हा ते म्हणाले होते, देशावरील दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती यांचा आशीर्वाद कमी झाला आहे. "काल मी मंदिरात (वैष्णो देवी) गेलो होतो, तेथे मला तीन देवी दिसल्या. दुर्गाजी, लक्ष्मीजी आणि सरस्वतीजी. दुर्गा हा शब्द 'दुर्ग' या शब्दापासून बनला आहे आणि देवी दुर्गा म्हणजे संरक्षण करणारी शक्ती आहे. देवी लक्ष्मी ही एक अशी शक्ती आहे, जी एखादे ध्येय साध्य करण्यास मदत करते. तर देवी सरस्वती शिक्षण आणि ज्ञानाची शक्ती आहे. जेव्हा देशात या तीनही शक्ती असतात तेव्हा देश समृद्ध होतो.''

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीMohan Bhagwatमोहन भागवतcongressकाँग्रेसRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघBJPभाजपा