'आई अन् मुलातील प्रेम खूप अमूल्य, मीही तुमच्यासोबत'; नरेंद्र मोदींसाठी राहुल गांधींचं ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 04:06 PM2022-12-28T16:06:16+5:302022-12-28T16:07:11+5:30

नरेंद्र मोदींच्या आईची प्रकृती बिघड्याची माहिती मिळताच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही ट्विट केलं आहे.

Congress leader Rahul Gandhi also tweeted after getting information about PM Narendra Modi's mother's condition. | 'आई अन् मुलातील प्रेम खूप अमूल्य, मीही तुमच्यासोबत'; नरेंद्र मोदींसाठी राहुल गांधींचं ट्विट

'आई अन् मुलातील प्रेम खूप अमूल्य, मीही तुमच्यासोबत'; नरेंद्र मोदींसाठी राहुल गांधींचं ट्विट

Next

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आई हीराबेन यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हीराबेन यांचं वय १०० वर्षांहून अधिक आहे. त्यांनी याचवर्षी जून महिन्यात वयाची १०० वर्षे पूर्ण केली होती. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले होते. नरेंद्र मोदी हे नियमितपणे आईच्या भेटीसाठी अहमदाबादमध्ये येत असतात. दरम्यान, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर येत आहे. 

नरेंद्र मोदींच्या आईची प्रकृती बिघड्याची माहिती मिळताच काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही ट्विट केलं आहे. आई आणि मुलगा यांच्यातील प्रेम हे खूप अमूल्य आहे. मोदीजी, या कठीण काळात माझे प्रेम आणि पाठिंबा तुमच्यासोबत आहे. मला आशा आहे की तुमची आई लवकरच बरी होईल, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.

तत्पूर्वी, नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन यांच्यावर अहमदाबादमधील यू. एन. मेहता रुग्मालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  हल्लीच झालेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीवेळी नरेंद्र मोदी यांनी गुजरात दौऱ्यावर असताना आईची भेट घेतली होती. अहमदाबाद विमानतळावर उतरल्यावर ते गांधीनगरमध्ये भेटण्यासाठी घरी गेले होते. तसेच त्यांचा आशीर्वाद घेतला होता.  

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद मोदी हे कालच एका अपघातात जखमी झाले होते. प्रल्हाद मोदी हे एका कार अपघातात जखमी झाले होते. कर्नाटकातील म्हैसूरजवळील कडकोला येथे त्यांच्या कारचा अपघात झाला होता. यावेळी प्रल्हाद मोदींसोबत त्यांचे कुटुंबीय होते. या अपघातात सर्वजण जखमी झाले आहेत. मंगळवारी दुपारी हा अपघात झाला होता.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: Congress leader Rahul Gandhi also tweeted after getting information about PM Narendra Modi's mother's condition.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.