राहुलजी मला माफ करा, पण मी रोबोट नाही; काँग्रेसच्या महिला नेत्याकडून शैक्षणिक धोरणाचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2020 08:32 PM2020-07-30T20:32:14+5:302020-07-30T20:35:46+5:30

काँग्रेस नेत्या खुशबू सुंदर यांच्याकडून सरकारच्या शैक्षणिक धोरणाचं कौतुक

congress leader khushbu sundar support new education policy apologize to rahul gandhi | राहुलजी मला माफ करा, पण मी रोबोट नाही; काँग्रेसच्या महिला नेत्याकडून शैक्षणिक धोरणाचं कौतुक

राहुलजी मला माफ करा, पण मी रोबोट नाही; काँग्रेसच्या महिला नेत्याकडून शैक्षणिक धोरणाचं कौतुक

googlenewsNext

नवी दिल्ली: मोदी सरकारनं काल नवं शैक्षणिक धोरण मंजूर केलं. तब्बल ३४ वर्षांनी देशात नवं शैक्षणिक धोरण लागू होणार आहे. याबद्दल सध्या संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. काँग्रेस नेत्या आणि अभिनेत्री खुशबू सुंदर यांनी नव्या शैक्षणिक धोरणाचं स्वागत केलं आहे. पक्षाच्या भूमिकेपेक्षा वेगळं मतं मांडल्याबद्दल त्यांनी ट्विट करून काँग्रेसचे खासदार राहुल गांधींची माफीदेखील मागितली आहे. 

नव्या शैक्षणिक धोरणाबद्दल माझी भूमिका पक्षापेक्षा वेगळी आहे. त्यासाठी मी राहुल गांधींची माफी मागते. मात्र मी कटपुतली किंवा रोबोटप्रमाणे मान  न डोलावता तथ्यांवर भाष्य करते. प्रत्येक मुद्द्यावर आम्ही आमच्या नेत्याशी सहमत असू शकत नाही. मात्र नागरिक म्हणून आपलं मत व्यक्त करू शकतो, असं सुंदर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. 



राजकारण केवळ गोंधळ घालण्यासाठी नाही. राजकारणात एकत्र येऊनही काम करायला हवं, असं मत सुंदर यांनी त्यांच्या दुसऱ्या ट्विटमधून व्यक्त केलं आहे. 'राजकारण म्हणजे निव्वळ गोंधळ नव्हे, ही गोष्ट भाजपा आणि पंतप्रधान कार्यालयानं समजून घ्यायला हवी. विरोधी पक्ष म्हणून आम्ही याकडे बारकाईनं लक्ष घालू आणि त्यातल्या त्रुटी दाखवू. सरकारनं नव्या शैक्षणिक धोरणेबद्दलच्या त्रुटींवरून प्रत्येकाला विश्वासात घ्यायला हवं,' असं सुंदर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

खुशबू सुंदर यांनी त्यांच्या पुढील ट्विटमध्ये विरोधी पक्षाच्या भूमिकेवर भाष्य केलं आहे. 'मी सकारात्मक पैलू पाहते. मला ते आवडतं. सकारात्मक बाबींकडे पाहून मी नकारात्मक गोष्टींवर काम करते. आपल्याला केवळ आवाज उठवायचा नाही, तर समस्यांवरील उपायदेखील सांगायचे आहेत. देशाच्या भविष्यासाठी काम करण्याची जबाबदारी विरोधी पक्षाचीदेखील आहे,' असं सुंदर यांनी ट्विटमध्ये नमूद केलं आहे.

नव्या शैक्षणिक धोरणाचं स्वागत करणाऱ्या सुंदर यांनी आपण भाजपामध्ये जाणार नसल्याचं पुढील ट्विटमध्ये स्पष्ट केलं आहे. 'संघाशी संबंधित मंडळी रिलॅक्स राहू शकतात. पण त्यांनी आनंदीत होऊ नये. मी भाजपात जाणार नाही. माझं मत पक्षापेक्षा वेगळं असू शकतं. कारण मी स्वतंत्र मतं असणारी व्यक्ती आहे. नव्या शैक्षणिक धोरणात त्रुटी आहेत. पण आम्ही सकारात्मकपणे बदलांकडे पाहू शकतो,' असं सुंदर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
 

Web Title: congress leader khushbu sundar support new education policy apologize to rahul gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.