शहरं
Join us  
Trending Stories
1
Malegaon Blast Case Verdict : प्रज्ञासिंह यांच्यासह सर्व आरोपी निर्दोष सुटले, १७ वर्षांनंतर एनआयएच्या विशेष न्यायालयाने दिला निकाल
2
कोण आहेत कर्नल पुरोहित? ज्यांना मालेगाव स्फोटाप्रकरणी निर्दोष सोडलं; ९ वर्ष जेलमध्ये टॉर्चर केले
3
आता अंतराळात युद्ध पेटणार?, चीन-रशियावर जपानचा गंभीर आरोप; भारतालाही सावध राहावं लागणार
4
"काँग्रेसच्या विकृत राजकारणाला चपराक, हिंदू समाजाला दहशतवादी ठरवण्याचं कारस्थान हाणून पाडलं"
5
"हिंदू कधी दहशतवादी असू शकत नाही..."; संसदेत गृहमंत्री अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
6
अमेरिकेचा भारतावर 'टॅरिफ बॉम्ब'! आता iPhone महागणार, 'मेक इन इंडिया'ला मोठा धक्का!
7
'भारत-रशिया त्यांच्या मृत अर्थव्यवस्था आणखी बुडवणार...', डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले
8
"तो एकदम छपरी आहे...", अहान पांडेबद्दल हे काय बोलून गेला 'सैयारा'चा दिग्दर्शक मोहित सुरी
9
२ ऑगस्टला जग अंधारात बुडणार नाही; दा. कृ. सोमण यांचे स्पष्टीकरण
10
ट्रम्प यांच्या २५% टॅरिफच्या घोषणेनंतर भारतातील 'हे' शेअर्स जोरदार आपटले; विकण्यासाठी रांग, तुमच्याकडे आहेत?
11
ठाण्यात राजकीय वातावरण तापले; राजन विचारे यांच्या बॅनरवरून शिंदे गट आणि ठाकरे गटात जुंपली
12
अहो आश्चर्यम! गर्भाशयात नाही, लिव्हरमध्ये वाढतंय बाळ; काय आहे इंट्राहेपॅटिक एक्टोपिक प्रेग्नन्सी?
13
कौतुक करता-करता कर लादला; ट्रम्प यांच्या 25% टॅरिफवरुन विरोधकांचा मोदी सरकारवार निशाणा
14
Video - भीषण! अमेरिकेमध्ये F-35 फायटर जेट क्रॅश; पायलटने 'असा' वाचवला जीव
15
ज्वेलरी शॉपमध्ये अचानक पुराचे पाणी घुसले, २० किलो सोन्याचे दागिने, हिरे वाहून गेले; लोक चिखल रापत बसले...
16
एकेकाळी ५ रुपयांसाठी मजुरी करायच्या, आज अमेरिकन कंपनीच्या CEO बनून १०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना देताहेत पगार
17
मेघा धाडेनं सांगितलं दुसरं लग्न करण्यामागचं कारण, म्हणाली - "त्या दिवशी मला..."
18
"हात जोडले, ५ मिनिटं मागितली, पण..."; बुलडोझर कारवाईनंतर भावाचा मृत्यू, भाजपा नेत्याची व्यथा
19
Hit and run: २१ वर्षांच्या मुलाला कारने चिरडलं अन् पळून गेली; कोण आहे नंदिनी कश्यप?
20
लेकीच्या जन्मानंतर इशिता दत्ताची तब्येत बिघडली, दोन वर्षांचा मुलगाही आजारी; दिली हेल्थ अपडेट

कधी येणार अच्छे दिन?; पोग्बाचा फनी व्हिडीओ ट्विट करत काँग्रेसची 'फ्री किक'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 17:00 IST

भाजपच्या 'अच्छे दिनां'वर काँग्रेसचा अचूक निशाणा

मुंबई: गेल्या लोकसभा निवडणुकांच्या प्रचारावेळी भाजपानं देशवासीयांना 'अच्छे दिन' आणण्याचं आश्वासन दिलं. खुद्द नरेंद्र मोदींनी त्यावेळी अनेक प्रचारसभांमध्ये 'अच्छे दिन'चा उल्लेख केला. त्यानंतर अच्छे दिन आयेंगे हे भाजपाचं घोषवाक्यच झालं. त्यामुळेच विरोधक भाजपा सत्तेत आल्यापासून त्यांना कायम 'अच्छे दिन कब आयेंगे?', असा प्रश्न विचारतात. आता फुटबॉल विश्वचषकातील अंतिम सामन्याचा व्हिडीओ ट्विट करत काँग्रेसनं भाजपाला 'अच्छे दिन'वरुन टोला लगावला आहे. रविवारी फिफा विश्वचषकाचा अंतिम सामना पार पडला. यामध्ये फ्रान्सनं क्रोएशियाला नमवत जगज्जेतेपद पटकावलं. या सामन्यानंतर फ्रान्सच्या खेळाडूंचा जल्लोष पाहण्यासारखा होता. फ्रान्सचा स्टार खेळाडू पोग्बा अंतिम सामन्यानंतर जल्लोष करताना इकडे तिकडे मान वळवत काहीतरी शोधत होता. त्याच्या या अजब कृतीनं त्यानं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. पोग्बा स्टेडियमचा कोपरा न कोपरा पाहत काहीतरी शोधत आहे, असं त्याच्या कृतीवरुन वाटत होतं. पोग्बाचा हाच अजब व्हिडीओ काँग्रेसनं ट्विटरवर शेयर केला आहे. 'कोणी अच्छे दिनाबद्दल विचारलं की पोग्बा आणि आमची अवस्था सारखीच असते,' असं ट्विट करत काँग्रेसनं 'अच्छे दिन'वरुन फ्री किक लगावली आहे. 

विशेष म्हणजे काँग्रेसनं या ट्विटमध्ये पोग्बाला टॅग केलं आहे. पोग्बाला भारतीय राजकारणाची आणि भाजपाच्या अच्छे दिनांच्या आश्वासनांची कल्पना आहे का, याची माहिती नाही. त्यामुळे काँग्रेसच्या ट्विटमध्ये आपल्याला टॅग करण्यात आलं आहे, याचं नोटिफिकेशन मिळाल्यावर पोग्बा संभ्रमात पडण्याची शक्यता आहे. आता काँग्रेसच्या या फ्री किकला भाजपाला कसं उत्तर दिलं जातं, हे पाहणं औत्सुकपूर्ण असेल. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसTwitterट्विटर