"आंबेडकरांचा पराभव करणाऱ्याला काँग्रेसनं पद्मभूषण दिलं, संपूर्ण देशभरात मोहीम चालवणार"; भाजपची घोषणा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 16:57 IST2024-12-23T16:56:05+5:302024-12-23T16:57:48+5:30

"आमच्यकडे सर्व कागदपत्रे आहेत आणि काँग्रेसने कशा प्रकारे सातत्याने बाबासाहेबांचा अपमान केला, हे आम्ही संपूर्ण देशभरातील लोकांपर्यंत पोहोचवणार."

congress gives padma bhushan who defeats Dr bhimrao Ambedkar BJP announces to run a campaign across the country! | "आंबेडकरांचा पराभव करणाऱ्याला काँग्रेसनं पद्मभूषण दिलं, संपूर्ण देशभरात मोहीम चालवणार"; भाजपची घोषणा!

"आंबेडकरांचा पराभव करणाऱ्याला काँग्रेसनं पद्मभूषण दिलं, संपूर्ण देशभरात मोहीम चालवणार"; भाजपची घोषणा!

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानाच्या मुद्द्यावरू गेल्या काही दिवसांपासून जबरदस्त राजकारण सुरू आहे. गृहमंत्री अमित शहा यांच्या संसदेतील भाषणाचा केवळ एका भाग उचलत काँग्रेस, आम आदमी पार्टी, बसपा आणि सपा यांच्यासह अनेक राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत. ते अमित शहा यांनी माफी मागावी अशी मागणी करत आहेत. आम आदमी पक्षाने तर हा मुद्दा दिल्ली निवडणूक प्रचाराचाच एक भागच बनवला आहे. त्यांचे नेते आणि कार्यकर्ते दलित वस्त्यांमध्ये जाऊन भाजप विरोधात प्रचार करत आहेत आणि त्यांच्यावर आंबेडकरांचा अवमान केल्याचा आरोप करत आहेत. तसेच, आपण देशभरात कार्यक्रम करणार आहोत, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. यातच आता, भाजपनेही काँग्रेसवर थेट हल्ला केला आहे.

यासंदर्भात, प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये बोलताना, आम्ही काँग्रेसचा बुरखा फाडणार आणि खरा चेहरा जनतेसमोर आणणार, असे भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वाधिक अपमान काँग्रेसनेच केला होता. जवाहरलाल नेहरू यांनी त्यांचा निवडणुकीत पराभव करवला होता आणि त्यांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी मैदानातही उतरले होते.

रविशंकर पुढे म्हणाले, "1952 च्या निवडणुकीत मुंबई उत्तर मध्य मतदारसंखात आंबेडकरांचा पराभव झाला होता आणि त्यांच्या विरोधात असलेले नारायण सदोबा काजरोळकर यांचा विजय झाला होता. त्या निवडणुकीत नेहरूंनी जबरदस्त प्रचार केला होता आणि आंबेडकरांविरोधातही प्रचार करण्यासाठी गेले होते. एवढेच नाही तर, याच नारायण सदोबा काजरोळकर यांना काँग्रेस सरकारने 1970 मध्ये देशाचा तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पुरस्कारही दिला होता."

रविशंकर प्रसाद पुढे म्हणाले, काँग्रेसचे नेतृत्व करणारे संपूर्ण नेहरू-गांधी कुटुंब आपल्यासाठी भारत रत्न घेत राहिला. मात्र, त्याला भीमराव आंबेडकरांना सन्मानित करण्यात आले नाही. उलट त्यांनी निवडणुकीत आंबेडकरांचा पराभव करणाऱ्या नारायण सदोबा काजरोळकर यांना पद्म भूषण दिले. आंबेडकरांचा याहून मोठा कोणताही अपमान असू शकत नाही." 

"आमच्यकडे सर्व कागदपत्रे आहेत आणि काँग्रेसने कशा प्रकारे सातत्याने बाबासाहेबांचा अपमान केला, हे आम्ही संपूर्ण देशभरातील लोकांपर्यंत पोहोचवणार. अमित शाह यांचा बचाव करत रविशंकर प्रसाद म्हणाले, "त्यांच्या भाषणाचा एक भाग कट करून पसरवला जात आहे. खोटा प्रचार केला जात आहे. आम्ही काँग्रेसला याचे उत्तर देणार आणि संपूर्ण देशभरात मोहीम चालवून त्यांचा आंबेडकरविरोधी विचार जनतेसमोर उघडा पाडणा."

Web Title: congress gives padma bhushan who defeats Dr bhimrao Ambedkar BJP announces to run a campaign across the country!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.