शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

हिमंता यांच्या गोळ्या झाडतानाच्या व्हिडिओवरून काँग्रेस भडकली; आसाम भाजपनं शेअर केलेला AI व्हिडिओ वाद वाढल्यानंतर केला डिलीट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2026 01:24 IST

यावर्षात आसाममध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. अशा परिस्थितीत हा व्हिडिओ समोर आल्याने वाद आणखी चिघळण्याची चिन्ह आहेत.

आसाम भाजपच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून एक व्हिडिओ प्रसारित करण्यात आला होता. या व्हिडिओनंतर, देशाच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. वाद वाढल्यानंतर हा व्हिडिओ हटवण्यातही आला, मात्र, या व्हिडिओवरून आसाममधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावर्षात आसाममध्ये विधानसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. अशा परिस्थितीत हा व्हिडिओ समोर आल्याने वाद आणखी चिघळण्याची चिन्ह आहेत.

व्हिडिओमध्ये काय? शनिवारी भाजपने 'पॉइंट ब्लँक शॉट' या कॅप्शनसह हा व्हिडिओ अपलोड केला होता. यात मुख्यमंत्री हिमंता टोपी घातलेल्या दोन व्यक्तींच्या चित्रांवर गोळ्या झाडताना दाखवण्यात आले आहेत. मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा 'काऊबॉय'च्या पेहरावात दिसत असून, व्हिडिओच्या शेवटी "बांगलादेशींवर दया नाही", "तुम्ही पाकिस्तानला का गेला नाही?" आणि "परकीयमुक्त आसाम", असे लिहिण्यात आले आहे.

"हे भाजपचे 'फॅसिस्ट' रूप" -काँग्रेसने या व्हिडिओचा निषेध केल आहे. तसेच, हे भाजपचे 'फॅसिस्ट' रूप असल्याचे म्हटले आहे. "हा केवळ ट्रोल कंटेंट नसून द्वेष पसरवणारा आणि अत्यंत विचलित करणारा प्रकार आहे." अशी प्रतिक्रिया काँग्रेसने दिली. काँग्रेस प्रवक्ता सुप्रिया श्रीनेत यांनी हा व्हिडिओ शेअर करत थेट पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. तसेच, "न्यायव्यवस्था व इतर संस्था झोपल्या आहेत का?" असा प्रश्नही केला आहे.

तृणमूल काँग्रेसने (TMC) या व्हिडिओला "नरसंहार आणि सामूहिक हत्येला दाखवलेली हिरवी झेंडी," म्हटले आहे. भाजपने भारताच्या राजकीय चर्चेची पातळी खालावली असून संविधानाच्या धर्मनिरपेक्ष भावनेला पायदळी तुडवले आहे, असा आरोप टीएमसीने केला. तर, सीपीएमने याला नरसंहारासाठीचे खुले आव्हान, असल्याचे म्हटले आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Congress enraged over Himanta's shooting video; Assam BJP deletes AI video.

Web Summary : Assam BJP shared a controversial AI video showing CM Himanta shooting at targets. Congress, TMC, and CPM condemned it as fascist, genocidal, and a threat to secularism, leading to its deletion amidst rising political tensions ahead of Assam elections.
टॅग्स :AssamआसामBJPभाजपाcongressकाँग्रेसElectionनिवडणूक 2026Politicsराजकारण