Congress criticizes PM Narendra Modi on rising inflation issue | 'अबकी बार महंगाई पर वार' म्हणणाऱ्या मोदींचे वाढत्या महागाईवर मौन, काँग्रेसची टीका 
'अबकी बार महंगाई पर वार' म्हणणाऱ्या मोदींचे वाढत्या महागाईवर मौन, काँग्रेसची टीका 

नवी दिल्ली  - एकीकडे देश आर्थिक संकटात सापडलेला असतानाच गेल्या काही काळात महागाईनेही उसळी घेतली आहे. अन्नधान्यापासून दैनंदिन वापरातील वस्तू मोठ्या प्रमाणावर महागल्याने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. दरम्यान, वाढत्या महागाईच्या मुद्यावरून आज काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील भाजपा सरकारवर घणाघाती टीका केली आहे. काही वर्षांपूर्वी 'अबकी बार महंगाई पर वार' म्हणणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाढत्या महागाईच्या प्रश्नावर गप्प बसले आहेत, असा टोला काँग्रेसने लगावला आहे. महागाईच्या प्रश्नावर मोदींच्या नेतृत्वातील भाजपा सरकार नाकर्ते झाले आहे. देशातील जनता महागाईने होरपळत असताना ना मोदी काही उत्तर देत आहेत, ना भाजपाकडून काही प्रतिक्रिया व्यक्त होत आहे, असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे.

''आतातर देशात देशात शाकाहारी होणेसुद्धा अपराध बनले आहे. भाजीपाला, खाद्यपदार्थांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. भात, गहू, साखर, भाजीपाला, खाद्यतेल असे सर्वच पदार्थ महागले आहेत. 2014 मध्ये कांद्याचा दर 8 रुपये प्रतिकिलो होता तो आज 85 रुपये झाला आहे. टोमॅटोचा दर 14 रुपये किलो होता, तो आज 39 रुपये किलो झाला आहे. 2014 मध्ये बटाटे 8 रुपये किलो होते ते 29 रुपये किलो झाले आहेत. लसुणीचा दर 290 रुपये प्रतिकिलो झाला आहेत,'' असे सांगत सुरजेवाला यांनी महागाईची आकडेवारीच माध्यमांसमोर मांडली. ॉ

'सरकारने जनतेचा खिसा कापून पोटावर लाथ मारली', महागाईवरून प्रियंका गांधींचा हल्लाबोल

महागाईने केला कहर; 'कांद्या'मुळे गाठला साडेपाच वर्षांतील उच्चांकी दर

महागाई आणखी वाढण्याची शक्यता;  महसूल वाढविण्याची केंद्राची तयारी

दरम्यान, देशातील किरकोळ महागाई दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. ही वाढ गेल्या साडेपाच वर्षांतील उच्चांकी आहे. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होण्याआधी जवळपास तेवढीच महागाई होती. जुलै 2014 मध्ये महागाई दर 7.39% होता. 
गेल्या नोव्हेंबरमध्ये 5.54 टक्के महागाई दर होता. सांख्य़िकी कार्यालयामध्ये सोमवारी आकडेवारी जाहीर केली. भाज्यांचे वाढलेले दर विशेषकरून डिसेंबरमध्ये कांद्याच्या दराने गाठलेला 200 चा आकडा महागाई दरावर प्रभाव टाकणारा ठरला आहे. डिसेंबरमध्ये भाज्यांचे दर 60.5 टक्के महाग झाले होते. खाद्यपदार्थांचा महागाई दर वाढून 14.12 टक्के झाला आहे. नोव्हेंबरमध्ये हा दर 10.01 टक्के होता. 

Web Title: Congress criticizes PM Narendra Modi on rising inflation issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.