महागाईने केला कहर; 'कांद्या'मुळे गाठला साडेपाच वर्षांतील उच्चांकी दर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 10:49 PM2020-01-13T22:49:47+5:302020-01-13T22:50:17+5:30

गेल्या नोव्हेंबरमध्ये 5.54 टक्के महागाई दर होता. सांख्य़िकी कार्यालयामध्ये सोमवारी आकडेवारी जाहीर केली.

Inflation rate incresed; because of 'Onion' reached the highest rate in five and a half years | महागाईने केला कहर; 'कांद्या'मुळे गाठला साडेपाच वर्षांतील उच्चांकी दर

महागाईने केला कहर; 'कांद्या'मुळे गाठला साडेपाच वर्षांतील उच्चांकी दर

Next

नवी दिल्ली : किरकोळ महागाई दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. ही वाढ गेल्या साडेपाच वर्षांतील उच्चांकी आहे. नरेंद्र मोदी हे पंतप्रधान होण्याआधी जवळपास तेवढीच महागाई होती. जुलै 2014 मध्ये महागाई दर 7.39% होता. 


गेल्या नोव्हेंबरमध्ये 5.54 टक्के महागाई दर होता. सांख्य़िकी कार्यालयामध्ये सोमवारी आकडेवारी जाहीर केली. भाज्यांचे वाढलेले दर विशेषकरून डिसेंबरमध्ये कांद्याच्या दराने गाठलेला 200 चा आकडा महागाई दरावर प्रभाव टाकणारा ठरला आहे. डिसेंबरमध्ये भाज्यांचे दर 60.5 टक्के महाग झाले होते. खाद्यपदार्थांचा महागाई दर वाढून 14.12 टक्के झाला आहे. नोव्हेंबरमध्ये हा दर 10.01 टक्के होता. 


आरबीआय रेपो रेट ठरविताना किरकोळ महागाई दर विचारात घेते. आरबीआयला हा दर 4 ते 6 टक्क्यांमध्ये हवा असतो. हा दर जुलैमध्येच सहा टक्क्यांच्या वर पोहोचला होता. यामुळे आरबीआय रेपो रेटमध्ये कमी करण्याची शक्यता कमी आहे. आरबीआय ६ फेब्रुवारीला याबाबत घोषणा करणार आहे. गेल्या वर्षी रेपो रेटमध्ये 1.35 टक्क्यांची कपात केली होती. 


केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा
केंद्र सरकार किरकोळ महागाई दरावरूनच कंझ्युमर प्राईस इंडेक्सच्या आधारे महागाई भत्त्याची वार्षिक दर ठरविते. याचा फायदा 50 लाख कर्मचारी आणि 62 लाख पेन्शनधारकांना होणार आहे.

Web Title: Inflation rate incresed; because of 'Onion' reached the highest rate in five and a half years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.