Congress criticizes Haryana chief minister over offensive statement against Sonia Gandhi | खट्टर नव्हे खेचर! सोनिया गांधींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांवर काँग्रेसची टीका 

खट्टर नव्हे खेचर! सोनिया गांधींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांवर काँग्रेसची टीका 

नवी दिल्ली - हरयाणामधील एका प्रचारसभेला संबोधित करताना सोनिया गांधींबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याविरोधात काँग्रेसने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. खट्टर यांनी केलेले वक्तव्य हे अत्यंत हीन दर्जाचे आणि भाजपाची महिलाविरोधी विचारसरणी दाखवणारे आहे. तसेच खट्टर यांनी आपल्या विधानासाठी माफी मागावी, अशी मागणीहीक काँग्रेसने केली. आहे. दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष नितीन राऊत यांनी मनोहरलाल खट्टर यांनी सोनिया गांधींबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध केला आहेत. तसेच हरयाणाचे मुख्यमंत्री खट्टर नसून खेचर आहेत, असा टोला लगावला.हरयाणामधील खरखोदा येथे एका सभेला संबोधित करताना मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांची तुलना मेलेल्या उंदराशी केली होती. त्यामुळे काँग्रेसचे नेते खट्टर यांच्याविरोधात आक्रमक झाले आहेत. 

दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष नितीन राऊत यांनी मनोहरलाल खट्टर यांनी सोनिया गांधींबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करताना खट्टर यांच्यावर जोरदार टीका केली आहे. हरयाणाचे मुख्यमंत्री खट्टर नसून खेचर आहेत, अशी टीका त्यांनी केली. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Congress criticizes Haryana chief minister over offensive statement against Sonia Gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.